प्योंगयांग: उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. किम यांच्या मनगटावरील घड्याळाची चर्चा रंगली आहे. काही दिवसांच्या अज्ञातवासानंतर किम जोंग यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. त्यावेळी किम यांच्या मनगटावरील घड्याळाने लक्ष वेधले. या घड्याळाच्या किंमतीवरून होत नाही. तर, किम यांच्या प्रकृतीवरून होत आहे. किम हे पूर्वीपेक्षा बारीक झाले असल्याचे म्हटले जात आहे. दक्षिण कोरियातील एनके न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांच्या फोटोचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये किम जोंग हे बारीक झाले असून त्यांचे वजन कमी झाले असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. किम जोंग उन यांच्या प्रकृतीवर आणि हालचालींवर जगातील अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांचे लक्ष असते. उत्तर कोरियाची शासकीय वृत्तसंस्था सेंट्रल न्यूज एजेन्सीने प्रसिद्ध केलेल्या नव्या छायाचित्रांमध्ये IWC Schaffhausen Portofino हे मनगटी घड्याळ दिसत आहे.
वाचा: होय, मी अजून जिवंत! ; निधनाच्या चर्चेनंतर किम जोंग पुन्हा दिसले
एवढे महागडे घड्याळ !
सेऊल येथील एका वृत्तवाहिनीने किम जोंग उन यांच्या या छायाचित्राच्या आधारे सांगितले की, घड्याळाची किंमत १२ हजार डॉलर आहे. किम यांची प्रकृती ठिक नसल्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षभरापासून किम जोंग अनेकवेळेस काही महिने अज्ञातवासात असतात. त्या दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असते.
प्रकृतीबाबत पुन्हा चर्चा सुरू
किम जोंग उन यांच्या कुटुंबात हृदयाशी संबंधित आजाराचा इतिहास आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार नोव्हेंबर महिन्यात किम जोंग यांचे वजन १४० किलोग्रॅमच्या जवळपास होते. किम यांनी २०११ मध्ये सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर जवळपास ५० किलो वजन वाढले आहे. किम जोंग उन हे दीर्घकाळ सत्तेवर राहण्यासाठी त्यांची प्रकृती बरी असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांची प्रकृती चांगली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. दक्षिण कोरियातील माध्यमांनुसार, किम यांच्यावर हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला.