अ‍ॅपशहर

नॉर्वेच्या PM ने मोदींना भेट म्हणून दिला फुटबॉल

जर्मनीतील 'जी-२० परिषदे'च्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक रंगीबेरंगी असलेला फुटबॉल भेट म्हणून दिला.

Maharashtra Times 9 Jul 2017, 9:33 am
मटा ऑनलाइन वृत्त । हॅम्बर्ग/नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम norway pm erna solberg gifts pm modi a symbolic football
नॉर्वेच्या PM ने मोदींना भेट म्हणून दिला फुटबॉल


जर्मनीतील 'जी-२० परिषदे'च्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी नॉर्वेच्या पंतप्रधान एरना सोलबर्ग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक रंगीबेरंगी असलेला फुटबॉल भेट म्हणून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या फुटबॉल मागचा खरा उद्देश म्हणजे टिकावू विकासाचे लक्ष्य प्राप्त करणे हा आहे. पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना फुटबॉलच्या माध्यमातून हा मेसेज सोल्बर्ग यांना द्यायचा होता म्हणून त्यांनी हा फुटबॉल मोदी यांना भेट म्हणून दिला. जी-२० परिषदेच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेच्या पंतप्रधान सोल्बर्ग या दोन नेत्यांमध्ये भारत-नार्वे या दोन्ही देशांच्या संबंधावर चर्चा झाली.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जगातील अनेक देशांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम इटलीचे पंतप्रधान पाउलो जेंटीलोनी यांची भेट घेतली. त्यानंतर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांची भेट घेतली. तसेच जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेवून त्यांच्यासोबत दोन्ही देशांच्या संबंधावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचीही भेट घेतली व चर्चा केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज