बेंगळुरू : 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मधील 'एअरो डायनामिक्स लॅबोरेटरी'मध्ये प्रयोग करताना झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात एका तंत्रज्ञाचा बुधवारी मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले. मनोज (वय ३२) असे मृत्युमुखी पडलेल्या तंत्रज्ञाचे नाव असून ते म्हैसूरमधील रहिवासी आहेत. एका खासगी स्टार्ट अप कंपनीचे चार तंत्रज्ञ प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करीत होते. दुपारी २.२०च्या सुमारास अचानक स्फोट झाला. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
स्फोटात एकाचा मृत्यू
'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मधील 'एअरो डायनामिक्स लॅबोरेटरी'मध्ये प्रयोग करताना झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात एका तंत्रज्ञाचा बुधवारी मृत्यू ...
Maharashtra Times 6 Dec 2018, 4:00 am