अ‍ॅपशहर

China: स्पेस स्टेशन उद्या पृथ्वीवर कोसळणार?

अंतराळात भरकटत असलेलं आणि चीनची प्रयोगशाळा म्हणून ओळखलं जाणारं स्पेस स्टेशन उद्या सोमवारी पृथ्वीवर कोसळणार आहे. स्कूल बसच्या आकाराएवढं असणारं हे स्पेस स्टेशन नेमकं कुठं कोसळणार याची काहीच शक्यता वर्तविण्यात आली नसल्यानं जगभरात आणि विशेषत: आशिया खंडासह भारतात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2018, 8:05 pm
बीजिंग: अंतराळात भरकटत असलेलं आणि चीनची प्रयोगशाळा म्हणून ओळखलं जाणारं स्पेस स्टेशन उद्या सोमवारी पृथ्वीवर कोसळणार आहे. स्कूल बसच्या आकाराएवढं असणारं हे स्पेस स्टेशन नेमकं कुठं कोसळणार याची काहीच शक्यता वर्तविण्यात आली नसल्यानं जगभरात आणि विशेषत: आशिया खंडासह भारतात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम out of control space lab to become celestial fireball on monday china
China: स्पेस स्टेशन उद्या पृथ्वीवर कोसळणार?


चीनने २०११ रोजी टीयाँगाँग नावाचं स्पेस स्टेशन अंतराळात सोडलं होतं. दोन वर्षांसाठी या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली होती, मात्र २०१६ मध्ये स्पेस स्टेशनशी चीनचा संपर्क तुटला. तेव्हापासून हे स्पेस स्टेशन अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत आहे. उद्या पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत येणार आहे. त्यानंतर ते कोसळेल. त्याचे तुकडे २०० ते ३०० मीटर पर्यंतच्या परिसरात कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

अंतराळातून पृथ्वीवर खाली कोसळताना त्याचे लहान लहान तुकडे होण्याची शक्यता आहे. त्यात विषारी वायू असण्याची शक्यता असल्याने या स्पेस स्टेशनच्या कोणत्याही सुट्ट्या भागांना हात लावू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या स्पेस स्टेशनला समुद्रात पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तत्पूर्वीच त्याच्याशी संपर्क तुटला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

मुंबईत कोसळणार?

अंतराळात तरंगत असलेल्या या स्पेस स्टेशनच्या मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बंगालचा उपसागर या पट्ट्यांचा समावेश आहे. मात्र त्याचा वेग पाहता हे स्पेस स्टेशन नेमकं कुठं पडेल याचा काहीच अंदाज नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, स्पेस स्टेशनचा मार्ग भारतातूनच जात असल्यानं भारतीयांमध्ये घबराट पसरली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज