अ‍ॅपशहर

शरीफ यांची मालमत्ता जप्त

पनामा पेपर घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार व मनी लाँडरिंगचा आरोप असलेले पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ (वय ६७) आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याचे, तसेच त्यांची बँक खाती गोठवण्याचे निर्देश पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरोने (एनएबी) शुक्रवारी दिले.

Maharashtra Times 23 Sep 2017, 3:00 am
लाहोर : पनामा पेपर घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार व मनी लाँडरिंगचा आरोप असलेले पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ (वय ६७) आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्याचे, तसेच त्यांची बँक खाती गोठवण्याचे निर्देश पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्युरोने (एनएबी) शुक्रवारी दिले. शरीफ यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan anti graft body freezes accounts of nawaz sharif and his family
शरीफ यांची मालमत्ता जप्त


पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्यावर अप्रामाणिकपणाचा ठपका ठेवत २८ जुलैला त्यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवले होते. तसेच त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवर भ्रष्टाचाराचे खटले दाखल करण्याचे आदेश दिले होते. इस्लामाबादेतील अकाउंटिबिलिटी कोर्टाने शुक्रवारी शरीफ, त्यांची कन्या मरियम आणि जावई कॅप्टन (निवृत्त) सफदर यांना २६ सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले. लाहोरजवळील राइविंड येथील शरीफ यांच्या घरावर हे समन्स आणि जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज