अ‍ॅपशहर

'कुलभूषण ६० दिवसांत दाद मागू शकतात'

'भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हे त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा आणि राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांच्याकडे ६० दिवसांच्या आत दाद मागू शकतात', असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Times 11 Apr 2017, 8:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan defence minister says indian national kulbhushan jadhav has right to appeal against his death sentence within 60 days
'कुलभूषण ६० दिवसांत दाद मागू शकतात'


'भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हे त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमार जावेद बाजवा आणि राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांच्याकडे ६० दिवसांच्या आत दाद मागू शकतात', असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे भारताने गंभीर परिणामांचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ख्वाजा यांच्या या विधानाला विशेष महत्त्व आहे.

असिफ यांनी पाक संसदेत आज कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेबाबत निवेदन केलं. यावेळी जाधव प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालेलं नाही, हा भारताचा आरोप असिफ यांनी फेटाळला. जाधव यांना सुनावलेली शिक्षा हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप भारताने केला आहे पण त्यात कोणतंही तथ्य नाही, असे त्यांनी पुढे नमूद केले.

'भारतीय गुप्तचर संस्था रॉ च्या इशाऱ्यावरून कुलभूषण जाधव काम करत होते आणि विध्वंसक कारवायांमध्ये त्यांचा हात होता हे सिद्ध झाले आहे. यात आम्हाला कोणतीही शंका नाही', असे विधानही त्यांनी केले. याप्रकरणी पाकिस्तान कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. अन्य कोणत्याही देशापेक्षा पाकिस्तानच दहशतवादाचा सर्वाधिक लक्ष्य ठरला आहे, असा दावाही त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज