अ‍ॅपशहर

भारताकडून हल्ले झालेच नाहीत; पाकचा दावा

युद्धाला आम्ही कधीही तयार आहोत, अशी फुशारकी मारणाऱ्या पाकिस्ताननं आता लाज वाचवण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्यानं हल्ले केलेच नाहीत, असा दावा आता पाकिस्तानकडून केला जात आहे. भारतानं सीमेपलिकडून गोळीबार केला, त्याला पाकिस्तानी सैन्यानं प्रत्युत्तर दिलं. हे नेहमीच होतं, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Maharashtra Times 29 Sep 2016, 2:35 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan denies india claim of surgical strikes along loc
भारताकडून हल्ले झालेच नाहीत; पाकचा दावा


'युद्धाला आम्ही कधीही तयार आहोत', अशी फुशारकी मारणाऱ्या पाकिस्ताननं आता लाज वाचवण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केलेच नाहीत, असा दावा पाकिस्ताननं केला आहे. 'भारतानं सीमेपलीकडून गोळीबार केला, त्याला पाकिस्तानी सैन्यानं प्रत्युत्तर दिलं. हे नेहमीचंच आहे,' अशी सारवासारव पाकनं केली आहे.

भारतीय लष्करातील महासंचालक (कारवाई विभाग) लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी निषेध नोंदवला होता. त्यामुळं पाकिस्तानच्या सैन्यानं केलेला दावा संशयास्पद असल्याचं बोललं जातं.

कथित दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याचं सांगून भारत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सीमेपलीकडून केलेला गोळीबार 'सर्जिकल स्ट्राइक' असल्याचं भासवण्यात येत आहे, असा कांगावाही पाकिस्तानी सैन्यानं केला आहे.

Pak media reporting #NawazSharif condemned "unprovoked and naked aggression" along the #LoC — ET Defence (@ETDefence) September 29, 2016

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज