अ‍ॅपशहर

पाकच्या माजी पंतप्रधानांविरोधात अटक वॉरंट

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पंतप्रधानपद सोडावे लागलेले नवाज शरीफ यांना पाकिस्तानी न्यायालयाने जबरदस्त धक्का दिला आहे. न्यायालयासमोर हजर न झाल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

Maharashtra Times 26 Oct 2017, 12:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त | इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistani court issues arrest warrant against former pm nawaz sharif
पाकच्या माजी पंतप्रधानांविरोधात अटक वॉरंट


भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पंतप्रधानपद सोडावे लागलेले नवाज शरीफ यांना पाकिस्तानी न्यायालयाने जबरदस्त धक्का दिला आहे. न्यायालयासमोर हजर न झाल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

शरीफ हे सध्या लंडनमध्ये आहेत. तेथे त्यांच्या पत्नीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी ही विनंती फेटाळत शरीफ यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. तसेच ३ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असून, त्यावेळी त्यांनी न्यायालयात हजर राहावे, असे आदेशही दिले. दरम्यान, पुढील सुनावणीआधी शरीफ यांनी जामीन मिळवला नाही तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवले होते. त्यानंतर त्यांना जुलैमध्ये पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज