अ‍ॅपशहर

अमेरिकी कॅम्पवर हल्ल्यास पाकने केली होती मदत

अमेरिका वेळोवेळी पाकिस्तानला आर्थिक मदत करत आली आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संघटनेच्या अहवालात अमेरिकेला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ने २००९ मध्ये अमेरिकेची गुप्तहेर संघटना ‘सीआयए’च्या अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कॅम्पवरील हल्ल्यासाठी पैशाची मदत केली होती.

Maharashtra Times 14 Apr 2016, 12:10 pm
चिदानंद राजघटा, वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistans isi funded deadly attack on cia camp in afghanistan
अमेरिकी कॅम्पवर हल्ल्यास पाकने केली होती मदत

अमेरिका वेळोवेळी पाकिस्तानला आर्थिक मदत करत आली आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संघटनेच्या अहवालात अमेरिकेला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ने २००९ मध्ये अमेरिकेची गुप्तहेर संघटना ‘सीआयए’च्या अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कॅम्पवरील हल्ल्यासाठी पैशाची मदत केली होती.

अफगाणिस्तानमध्ये ३० डिसेंबर २००९ रोजी हा हल्ला करण्यात आला होता. आयएसआयने केलेल्या पैशांच्या मदतीवर करण्यात आलेल्या या हल्ल्यात अमेरिकेचे ७ एजंट, एका कॉन्ट्रॅक्टरसह अन्य ३ लोकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यासाठी आयएसआयने २ लाख डॉलरची मदत केली होती.

हा हल्ला जॉर्डनचा एक डॉक्टर आणि डबल एजंट खलिल अबु-मुलाल अल-बलावी याने केला होता. या डबल एजंटचा वापर पाकिस्तानात ओसामा बिन लादेन आणि जवाहिरी यांचा शोध घेण्यासाठी करत होती. मात्र आयएसआयचाच एक भाग असलेली दहशतवादी संघटना हक्कानी ग्रुपने या एजंटला आपल्याजवळ केले.

अल-बलावीने ३० डिसेंबर २००९ रोजी कॅम्पवर आत्मघातकी हल्ला केला, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचे प्रकरण 'झीरो डार्क थर्टी' सिनेमात देखील दाखवण्यात आले होते. पाकिस्तानचे समर्थन असणाऱ्या दहशतवाद्यांनी भारत आणि अमेरिकेचे अनेक सैनिक तसेच नागरिकांचे प्राण घेतले आहेत, असेही सांगण्यात येते. ही माहिती समोर आल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज