अ‍ॅपशहर

भारतामुळे शांतता धोक्यात

भारताने काश्मीर समस्येवर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानचे मावळते लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी भारताला इशारा दिला आहे. पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली.

Maharashtra Times 30 Nov 2016, 2:49 am
पाकिस्तानच्या मावळत्या लष्करप्रमुखांचे रडगाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistans outgoing army chief raheel sharif issues warning to india
भारतामुळे शांतता धोक्यात


वृत्तसंस्था, इस्लामाबाद

भारताने काश्मीर समस्येवर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानचे मावळते लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी भारताला इशारा दिला आहे. पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारली.

या वेळी राहील शरीफ म्हणाले, ‘काश्मीरमधील भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे हा प्रदेश धोक्यात आला आहे. आमचा संयम म्हणजे आमचा दुबळेपणा नव्हे, हे भारताने समजून घ्यायला हवे. काश्मीर समस्या सुटल्याशिवाय दक्षिण आशियामध्ये शांतता आणि प्रगती नांदू शकणार नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. देशाला भेडसावणाऱ्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सर्व संस्थांनी मिळून काम करायला हवे.’

शरीफ म्हणाले, ‘प्रादेशिक शांततेसाठी राजकीयदृष्ट्या समस्या सुटण्याची गरज आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा शांततेसाठी महत्त्वाचा घटक ठरू शकतो. ग्वादार बंदरातून पहिले वाहन चीनकरिता रवाना झाले आहे. त्यावरून हा प्रवास आता थांबणारा नाही, हे निश्चित आहे. या महामार्गाला विरोध करणाऱ्यांनी (भारताचे नाव न घेता इशारा) विरोध करणे थांबवावे.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज