अ‍ॅपशहर

ओर्ली विमानतळावर गोळीबारात एक ठार

गेल्या काही महिन्यांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर फ्रान्समध्ये आधीच आणीबाणीची परिस्थिती असताना, राजधानी पॅरिसमधील ओर्ली विमानतळावर एका सैनिकाचे शस्त्र हिसकावून घेणाऱ्या एका व्यक्तीला सुरक्षा दलांनी शनिवारी कंठस्नान घातले.

Maharashtra Times 19 Mar 2017, 2:57 am
पॅरिस : गेल्या काही महिन्यांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर फ्रान्समध्ये आधीच आणीबाणीची परिस्थिती असताना, राजधानी पॅरिसमधील ओर्ली विमानतळावर एका सैनिकाचे शस्त्र हिसकावून घेणाऱ्या एका व्यक्तीला सुरक्षा दलांनी शनिवारी कंठस्नान घातले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. फ्रान्समध्ये काही आठवड्यातच अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून ब्रिटनचे राजपुत्र विल्यम्स आणि केट हेही सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paris orly airport armed assailant shouted i am here to die for allah
ओर्ली विमानतळावर गोळीबारात एक ठार


पॅरिस शहरातील दुसऱ्या क्रमांकाच्या ओर्ली विमानतळावर स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. त्यानंतर हे विमानतळ रिकामे करण्यात आले असून दोन्ही टर्मिनल बंद करण्यात आली आहेत.

ओर्ली विमानतळावरील थरारनाट्याच्या दीड तास आधीच पॅरिसच्या स्टेन्स या उपनगरात तपासणीसाठी थांबवलेल्या गाडीतून उतरलेल्या एका व्यक्तीने एका पोलिसावर गोळी झाडली. यात हा पोलिस अधिकारी किरकोळ जखमी झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज