अ‍ॅपशहर

प्रवासी विमान तळ्यात उतरले

वृत्तसंस्था, मजुरो (मार्शल बेटे) पापुआ न्यू दिनीहून निघालेले एक प्रवासी विमान शुक्रवारी धावपट्टीऐवजी खाऱ्या पाण्याच्या सरोवरात अर्धवट बुडालेल्या ...

PTI 29 Sep 2018, 4:00 am

वृत्तसंस्था, मजुरो (मार्शल बेटे)

पापुआ न्यू दिनीहून निघालेले एक प्रवासी विमान शुक्रवारी धावपट्टीऐवजी खाऱ्या पाण्याच्या सरोवरात अर्धवट बुडालेल्या स्थितीत आपत्कालीन स्थितीत उतरले. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांना काही काळ पाण्यात पोहणे भाग पडले. या दुर्घनेत जीवितहानी झाली नाही.

मजुरो हे ठिकाण ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला प्रशांत महासागरात मार्शल बेटांजवळ आहे. एअर न्यू गिनीचे ७३७-८०० प्रकारचे प्रवासी विमान मायक्रोनेशियातील विनो विमानतळावर उतलणार होते. मात्र, खराब हवामानामुळे ते धावपट्टीऐवजी चूक या खाऱ्या पाण्याच्या सरोवरात घुसले. विमानाचा अर्धा भाग पाण्यात बुडाला होता. स्थानिकांनी तातडीने नौकांचा ताफा आणून ३५ प्रवासी आणि १२ कर्मचाऱ्यांची सुटका केली. याच विमानाची काही महिन्यांपूर्वी अन्य एका विमानाशी धडक झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज