अ‍ॅपशहर

नैराश्य घालविण्यासाठी व्हिडिओ गेम खेळा

नैराश्याची शिकार झालेला असाल आणि त्यातून बाहेर पडायचे असेल तर आता डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. औषधे घेण्याचीही गरज नाही. नैराश्याने ग्रासल्यावर बिनधास्त व्हिडिओ गेम खेळा आणि नैराश्यातून बाहेर पडा. वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य आणि विचित्रही वाटेल. पण ते खरंय. व्हिडिओ गेम खेळल्याने रूग्ण नैराश्यातून बाहेर पडू शकत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

Maharashtra Times 29 Mar 2017, 12:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । न्यूयॉर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम playing video games is helpful in fighting depression
नैराश्य घालविण्यासाठी व्हिडिओ गेम खेळा

नैराश्याची शिकार झालेला असाल आणि त्यातून बाहेर पडायचे असेल तर आता डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. औषधे घेण्याचीही गरज नाही. नैराश्याने ग्रासल्यावर बिनधास्त व्हिडिओ गेम खेळा आणि नैराश्यातून बाहेर पडा. वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य आणि विचित्रही वाटेल. पण ते खरंय. व्हिडिओ गेम खेळल्याने रूग्ण नैराश्यातून बाहेर पडू शकत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

नोकरीत येणारे नैराश्य असो की अन्य कोणत्याही कारणाने येणारे नैराश्य असो या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी व्हिडिओ गेम खेळणं अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे. शरिरातील अंतर्गत असंतूलन समतोल पातळीवर आणण्याचं काम व्हिडिओ गेम खेळल्यानं होत असल्याचं सिद्ध झालं आहे. मानसिक आरोग्यापासून दिलासा मिळण्यासाठी व्हिडिओ गेमचा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो, असं अमेरिकेच्या डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सुबुही खान यांनी सांगितलं.

संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष

> व्हिडिओ गेमवर आधारित अॅपमुळे मेंदू प्रशिक्षित होतो. त्यामुळे मेंदूत सकारात्मक बदल होतो

> या प्रयोगात नैराश्य आलेल्या लोकांना अधिकाधिक काळ व्हिडिओ गेम खेळायला दिला. त्यामुळे ते मनावर ताबा ठेऊ शकले

> व्हिडिओ गेम खेळल्याने मानसिक नैराश्याने ग्रासलेल्यांना तात्काळ फरक पडल्याचे दिसून आले

> 'कॉम्प्यूटर्स इन हृयूमन बिहेविअर' या जर्नलमध्ये शोधाची माहिती देण्यात आली आहे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज