अ‍ॅपशहर

गांधीजींच्या समतेच्या संघर्षवाटेवर पंतप्रधानांचे ‘पाऊल’

मोहनदास करमचंद गांधी यांच्या समतेच्या संघर्षाची बीजे ज्या प्रवासात रोवली गेली, तो ऐतिहासिक रेल्वेप्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वर्तमानात अनुभवला. एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या ‘कृष्णवर्णीय’ गांधींना दक्षिण आफ्रिकेतील ज्या स्थानकात जबरदस्तीने उतरवण्यात आले, त्याच पीटरमारित्झबर्ग या स्थानकाला पंतप्रधानांनी भेट दिली व गांधीजींच्या महात्मा बिरुदापर्यंतच्या समतेच्या संघर्षवाटेचे ते साक्षीदार बनले.

Maharashtra Times 10 Jul 2016, 2:00 am
वृत्तसंस्था, पीटरमारित्झबर्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi retraces mahatma gandhis train journey
गांधीजींच्या समतेच्या संघर्षवाटेवर पंतप्रधानांचे ‘पाऊल’

मोहनदास करमचंद गांधी यांच्या समतेच्या संघर्षाची बीजे ज्या प्रवासात रोवली गेली, तो ऐतिहासिक रेल्वेप्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वर्तमानात अनुभवला. एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या ‘कृष्णवर्णीय’ गांधींना दक्षिण आफ्रिकेतील ज्या स्थानकात जबरदस्तीने उतरवण्यात आले, त्याच पीटरमारित्झबर्ग या स्थानकाला पंतप्रधानांनी भेट दिली व गांधीजींच्या महात्मा बिरुदापर्यंतच्या समतेच्या संघर्षवाटेचे ते साक्षीदार बनले.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान दोन्ही देशांना जोडणाऱ्या सर्वात भक्कम व ऐतिहासिक क्षणाला सामोरे गेले. ज्या रेल्वेप्रवासात गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाचे चटके जाणवले, त्याच मार्गावरून पंतप्रधान मोदी यांनी प्रवास केला. मोदी यांनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ही इच्छा व्यक्त केली आणि द. आफ्रिकन सरकारने ती लागलीच पूर्णही केली. मोदी पेंट्रिच स्थानकात ट्रेनमध्ये चढले. गांधीजींच्या याच प्रवासाच्या स्मृती जपण्यासाठी आफ्रिकन रेल्वेने त्या काळासारखीच गाडी अजूनही ताफ्यात ठेवली आहे. याच रेल्वेगाडीत मोदी ६४ क्रमांकाच्या खिडकीजवळील आसनावर स्थानापन्न झाले. लाकडी डब्याची ही रेल्वेगाडी जणू त्याच क्षणांची स्मृती घेऊन धावत होती. १५ किमी अंतर पार करून मोदी पीटरमारित्झबर्ग स्थानकात पोहोचले, तेव्हा आफ्रिकन नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. या स्थानकात आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाचे मोदी यांनी उद्घाटन केले व ऐतिहासिक प्रवासाच्या स्मृती साठवून ते पुन्हा जोहान्सबर्गला पोहोचले.

ऐतिहासिक ७ जून, १८९३

याच दिवशी गांधीजींनी प्रिटोरियाला जाण्यासाठी डर्बनहून ट्रेन पकडली. फर्स्ट क्लासचे तिकीट काढून ते आपल्या सीटवर स्थानापन्नही झाले. मात्र या ‘काळ्या’ प्रवाशाला आपल्या डब्यात पाहून खवळलेल्या श्वेतवर्णीय प्रवाशाने त्यांना तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जाण्याचा आदेश दिला. गांधीजींनी त्यास नकार दिल्यानंतर पीटरमारित्झबर्ग स्थानकात गांधीजींचे सामान फेकून देण्यात आले व कडाक्याच्या थंडीच्या रात्री त्यांना जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले.

माझा दक्षिण आफ्रिकेचा दौरा एक तीर्थयात्राच ठरलाी आहे. विश्वातील दोन महान व्यक्तींच्या इतिहासाचा साक्षीदार व्हायची संधी मला मिळाली.- पंतप्रधान नरेंद्र मोदी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज