अ‍ॅपशहर

PM Modi 'पंतप्रधान मोदी यांनी भारताची लोकशाही अंंधारात नेली'

PM Modi in time list टाइम नियतकालिकेने वर्ष २०२० मधील जगभरातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश केला आहे. या यादीत पंतप्रधान मोदींशिवाय बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाचाही समावेश आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2020, 10:38 am
वॉशिंग्टन: अमेरिकेतील सुप्रसिद्ध नियतकालिक 'टाइम'ने जगातील सर्वाधिक प्रभावी १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, 'टाइम'ने पंतप्रधान मोदी यांचा समावेश करताना टीकात्मक सुरू लावला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही पंतप्रधान मोदी यांनी अंधाराकडे नेली असल्याचे 'टाइम'ने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi in TIME list
टाइमच्या १०० प्रभावी व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत टाइमने म्हटले की, लोकशाहीमध्ये फक्त निवडणुकीत विजयी होणे एवढेच महत्वाचे नसते. निवडणुकीत फक्त कोणाला अधिक मतदान झाले आहे. याबाबतची माहिती समजते. निवडणुकीपेक्षाही काही बाबी महत्वाच्या आहेत. ज्या समुदायाने समाजघटकाने तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्या अधिकारांबाबत तुम्ही काय भूमिका घेता हे महत्त्वाचे असल्याचे टाइमने म्हटले आहे.

वाचा: IG Nobel विजेते PM मोदी दुसरे भारतीय पंतप्रधान; 'या' कारणासाठी असतो पुरस्कार!

मागील सात दशकांपासून भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या १३० कोटी लोकसंख्येत हिंदूसह, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन आणि इतर धर्मियांचाही समावेश आहे. टाइमचे संपादक कार्ल विक यांनी म्हटले की, भारतात अनेक वर्षांपासून शरणार्थी म्हणून वास्तव्यास असणाऱ्या दलाई लामा यांनी सद्भाव, एकोपा आणि स्थिरता याचे उदाहरण म्हणून भारताचे उदाहरण दिले होते. भारताबाबत असे मत असणाऱ्यांच्या मनात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संशय निर्माण केला आहे. भारताचे बहुतांशी पंतप्रधान हे ८० टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदू समुदायातून आलेले होते. मात्र, त्यापैकी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इतर धर्मियांना कोणतेच स्थान नाही, असे वातावरण निर्माण केले असल्याचे कार्ल यांनी सांगितले.

वाचा: अमेरिकेतील निवडणुकीत PM मोदींचे मित्र पराभवाच्या छायेत?

कार्ल विक यांनी म्हटले की, 'नरेंद्र मोदी लोकप्रिय घोषणा, आश्वासने देऊन सत्तेवर आले. मात्र, त्यांच्या हिंदुत्ववादी भाजप पक्षाने बहुसंख्यवादाच्या नावावर मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यात आले. द्वेषावर आधारीत असलेल्या बहुसंख्यवादाच्या राजकारणामुळे करोना महासाथीमुळे निर्माण झालेला असंतोष दडपून टाकणे सरकारला शक्य झाले. जगातील सर्वात मोठी लोकशाही अंधकाराकडे जात असल्याचे टाइमने म्हटले आहे. याआधीदेखील टाइममध्ये पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारे आणि टीका करणारे लेख प्रकाशित केले होते. त्यावेळीही त्याची मोठी चर्चा झाली होती.

वाचा: नेपाळची आगळीक; डेहराडून, नैनितालसह काही शहरांवर ठोकला दावा!

दरम्यान, टाइमच्या १०० प्रभावी व्यक्तींच्या यादीत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना, एचआयव्ही संशोधक रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनात सहभागी असलेली बिल्किसचाही समावेश करण्यात आला आहे. तर, पंतप्रधान मोदींशिवाय या यादीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, तैवानचे राष्ट्रपती त्सेइंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या सिनेटर कमला हॅरिस, जो बायडन, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आदींचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज