अ‍ॅपशहर

जमाव हिंसेविरुद्ध पोलिसांची शांतता रॅली

वृत्तसंस्था, इम्फाळ मणिपूर पोलिसांनी सोमवारी राज्यातील जमाव हिंसेविरुद्ध भारत आणि म्यानमारच्या सीमेवरील मोरेह ते तेंग्नोपालपर्यंत रॅली काढली...

Maharashtra Times 19 Sep 2018, 4:00 am

वृत्तसंस्था, इम्फाळ

मणिपूर पोलिसांनी सोमवारी राज्यातील जमाव हिंसेविरुद्ध भारत आणि म्यानमारच्या सीमेवरील मोरेह ते तेंग्नोपालपर्यंत रॅली काढली. तेंग्नोपालचे पोलीस अधीक्षक एस. इबोंचा सिंग यांनी नेतृत्व केलेल्या या रॅलीत ७० जवानांसह विविध स्वयंसेवी संस्थांतील ५०० स्वयंसेवकही सहभागी झाले होते.

समाजातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याविषयीची जनजागृती करण्यासाठी मोरेह पोलिस स्टेशन ते तेंग्नोपाल जिल्हा मुख्यालयापर्यंत ही दोन किलोमीटरची शांतता रॅली काढण्यात आल्याचे इबोंचा सिंग यांनी सांगितले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले, की अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच शांतता रॅली होती. इम्फाळ जिल्ह्याच्या पश्चिम भागातील थारोईजाम येथे दुचाकी चोरल्याच्या संशयावरून २६ वर्षांच्या एका तरुणाला जमावाने ठार केल्याची घटना घडल्यानंतर चार दिवसांनी ही रॅली निघाली. कथित चोरट्याच्या दोन साथीदारांनी चोरीदरम्यान एक कार वापरल्याच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी ती कारही पेटवून दिली. पाच जणांसह इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) एका हवालदारालाही या संदर्भात अटक करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज