अ‍ॅपशहर

काबूल: संरक्षण मंत्र्यांच्या घरावर आत्मघाती हल्ला; चार तास चकमक, हल्लेखोर ठार

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या घरावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर चकमकही झाली. यामध्ये चार हल्लेखोर ठार झाले आहेत. या स्फोटामुळे खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2021, 10:44 am
काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूल स्फोटाने हादरली. मंगळवारी रात्री अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी यांच्या घराजवळ आत्मघाती हल्ला झाला. या स्फोटानंतर जवळपास चार तास चकमक सुरू होती. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kabul car bomb blast
संरक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर सुरक्षा जवानांनी धाव घेतली


टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी यांच्या घराबाहेर एका कारमध्ये स्फोट झाला. हा स्फोट झाल्यानंतर गोळीबारही करण्यात आला. काही हल्लेखोर संरक्षण मंत्र्याच्या निवास स्थानाच्या आवारात शिरले. सुरक्षा दलाच्या जवानांनी चार हल्लेखोरांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे.

वाचा: हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानचे भारताला साकडं; केली 'ही' मागणी!



वाचा: तालिबानची क्रूरता; वडील सैन्यात म्हणून लहान मुलाला १०० फटक्यांची शिक्षा

'रायटर्स' या वृत्तसंस्थेनुसार, स्फोट झालेल्या परिसरात अनेक शासकीय इमारती असून महत्त्वाच्या व्यक्तिंचे निवासस्थान आहेत. या परिसरात राष्ट्रपती भवनदेखील आहे. त्याशिवाय काही देशांचे दूतावास आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांची कार्यालये आहेत. या परिसरात वर्दळही असते.



अफगाण सैन्य आणि तालिबानमध्ये तीन प्रांतात घनघोर संघर्ष; विमान सेवा बंद

संरक्षण मंत्री सुरक्षित

अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी खान यांनी व्हिडिओ प्रसारीत करून आपण सुखरूप असल्याचे सांगितले. आपल्या निवासस्थानावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. आपण व कुटुंबीय सुरक्षित आहोत. मात्र, काही सुरक्षा रक्षक जखमी झाले असल्याचे त्यांनी म्हटले. या भ्याड हल्ल्यानंतर आपण घाबरणार नसून तालिबानींना प्रत्युत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज