अ‍ॅपशहर

प्रीती पटेल यांचा अखेर राजीनामा

ऑगस्ट महिन्यात इस्रायलमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेल्या असताना इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह त्या देशाच्या अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणाऱ्या आणि त्याबाबत देशाच्या परराष्ट्र खात्याला अंधारात ठे‍वणाऱ्या भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी बुधवारी रात्री राजीमाना दिला.

Maharashtra Times 10 Nov 2017, 2:39 am
लंडन : ऑगस्ट महिन्यात इस्रायलमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेल्या असताना इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह त्या देशाच्या अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणाऱ्या आणि त्याबाबत देशाच्या परराष्ट्र खात्याला अंधारात ठे‍वणाऱ्या भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी बुधवारी रात्री राजीमाना दिला. या भेटींवरून वादंग झाल्यानंतर त्यांचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपद धोक्यात आले होते. आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी तडकाफडकी परत बोलावले होते. बुधवारी रात्री त्यांनी थेरेसा यांची भेट घेतली आ‌णि त्यानंतर राजीनाम्याची घोषणा केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज