अ‍ॅपशहर

‘कलाकारांना लक्ष्य करणे चुकीचे’

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वेळी कलाकारांनाच लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे तिने म्हटले आहे.

Maharashtra Times 17 Oct 2016, 3:28 am
न्यूयॉर्क : उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वेळी कलाकारांनाच लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे तिने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम priyanka chopra opposes ban on pakistani actors
‘कलाकारांना लक्ष्य करणे चुकीचे’


‘कोणत्याही मोठ्या राजकीय विषयावर कलाकारांनाच जबाबदार धरले जाते. फक्त कलाकारांनाच का? उद्योजक, डॉक्टर, राजकारणी यांना का नाही? ‘चेहरा’ असणाऱ्या कलाकारांना आणि सिनेसृष्टीलाच धारेवर धरले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे मी टोकाची देशभक्त आहे. देशाच्या सुरक्षेसाठी माझे सरकार जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. कलाकारांच्या मुद्द्यापेक्षा सुरक्षेचा मुद्द्यावर भर द्यायला हवा’, असेही प्रियांका म्हटली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज