अ‍ॅपशहर

पुतिन यांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

​​​​र​शिया येथे सप्टेंबरच्या प्रारंभी होणाऱ्या इस्टर्न इकनॉमिक फोरम परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आमं६ण मोदी यांनी स्वीकारले असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. दरम्यान, जपानमधील ओसाका येथे २८ व २९ जून रोजी होणाऱ्या जी-२० परिषदेदरम्यान भारत, रशिया आणि चीन यांच्यात त्रिपक्षीय चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2019, 4:00 am
बिश्केक :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi-putin


रशिया येथे सप्टेंबरच्या प्रारंभी होणाऱ्या इस्टर्न इकनॉमिक फोरम परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आमं६ण मोदी यांनी स्वीकारले असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. दरम्यान, जपानमधील ओसाका येथे २८ व २९ जून रोजी होणाऱ्या जी-२० परिषदेदरम्यान भारत, रशिया आणि चीन यांच्यात त्रिपक्षीय चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इम्रान यांना टाळले


शांघाय कार्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बिश्केकमध्ये एकाच छताखाली असूनही मोदी यांनी इम्रान यांना टाळले. रात्रीच्या भोजनासाठी मोदी व इम्रान या दोन्ही नेत्यांचे जवळपास एकाचवेळी आगमन झाले. मोदी इम्रान यांच्या पुढे चालत होते. मात्र, दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहिले नाही वा हस्तांदोलनही केले नाही.

...................

शांघाय कार्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज