अ‍ॅपशहर

russia ukraine news : जग हादरणार! रशिया युक्रेनवर टाकणार 'हा' महाविद्ध्वंसक बॉम्ब, ब्रिटनचा दावा

रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे जगभरात चिंतेची स्थिती आहे. रशियाने युक्रेनवर हल्ल्याची मोठी तयारी केली आहे. आता ब्रिटनमधील सूत्रांनी धक्कादाय माहिती दिली आहे. रशिया युक्रेनवर 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'चा हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे, असा दावा केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2022, 7:27 pm
लंडन/कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती असून सुमारे दोन लाख रशियन सैनिकांनी ( Russia Ukraine Crisis ) युक्रेनला वेढा घातला आहे. रशियाने आपल्या सैन्याला हल्ल्यासाठी तयार केल्याचे नुकत्याच मिळालेल्या उपग्रह फोटोंमधून दिसून आले आहे. दरम्यान, रशिया 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'ने ( father of all bombs ) हल्ला सुरू करू शकतो, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण सूत्रांनी केला आहे. बॉम्ब अणुबॉम्बनंतर रशियाचा हा जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब मानला जातो. या बॉम्बच्या स्फोटामुळे ४४ टन टीएनटीचा स्फोट होतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम putin set to drop 44 ton father of all bombs in ukraine amid nato warns russia attack plans
जग हादरणार! रशिया युक्रेनवर टाकणार 'हा' महाविद्ध्वंसक बॉम्ब, ब्रिटनचा दावा


दहशत निर्माण करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून रशियन राष्ट्राध्यक्षांनी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब्स' टाकण्यास मंजुरी दिली आहे, असे ब्रिटनमधील वृत्तपत्र मिररने ब्रिटनच्या संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर म्हटले आहे. हे अति-विध्वंसक शस्त्र एखाद्या लढाऊ विमानातून सोडले जाऊ शकते, जे हवेत स्फोट करते आणि लहान अणुबॉम्ब टाकल्याप्रमाणेच विनाश घडवते. हवा आणि इंधन मिसळल्यावर ते भयंकर होते. तज्ज्ञांच्या मते हा बॉम्ब टाकल्यावर सुपरसॉनिक वेव्ह निर्माण होतात. या बॉम्बच्या स्फोटामुळे इतकी ऊर्जा आणि उष्णता बाहेर पडते की ते त्याचे लक्ष्य क्षणात नष्ट होते.

फादर ऑफ ऑल बॉम्ब्स २००७ मध्ये विकसित

युक्रेनियन जनतेची लढण्याची भावना संपवण्यासाठी युद्धाची सुरवात म्हणून 'फादर ऑफ ऑल बॉम्ब्स' टाकू शकतात, असे ब्रिटनच्या सूत्रांनी सांगितले. हा बॉम्ब रशियाने सीरियात टाकला होता. 'या बॉम्बचा परिणाम खूप भयानक असेल. हे एक प्रकारचे मानसिक शस्त्र आहे. यामुळे मोठ्या संख्येने लोक मारले जातील आणि रणगाडे नष्ट होतील', असे संरक्षण सूत्राने सांगितले. फादर ऑफ ऑल बॉम्ब्स अमेरिकेच्या मदर ऑफ ऑल बॉम्बपेक्षा ४ पट अधिक शक्तिशाली आहे. द फादर ऑफ ऑल बॉम्ब्स रशियाने २००७ मध्ये विकसित केला होता, असे सीएनएनने म्हटले आहे.

यामुळे होणारा विध्वंस जवळपास अणुबॉम्बसारखा आहे. पण त्यामुळे रेडिएशनचा धोका नाही. सध्या फक्त रशियाकडे हा बॉम्ब आहे. हा बॉम्ब टाकल्यानंतर तो हवेतच फुटतो. 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'च्या स्फोटातून ४४ टन ऊर्जा निर्माण करतो. तर मदर ऑफ ऑल बॉम्बच्या स्फोटातून ११ टन ऊर्जा निर्माण होते. 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'चे वजन ७ हजार १०० किलो आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानवर गैर-अण्वस्त्र बॉम्ब टाकला तेव्हा त्यामुळे जमिनीत १००० फुटांपर्यंत मोठे सुरूंग तयार झाले होते. आजूबाजूचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता. रशियाचा बॉम्ब अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने अधिक विनाश घडवू शकतो.

युद्धाचे काळे ढग दाटले! पुतीन यांना भेटण्यास बायडन तयार, पण घातली 'ही' अट

जमीन, हवेतून आणि समुद्रातून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची रशियाची चाचणी

युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने शनिवारी जमीन, हवेतून आणि समुद्रातून सुपर-डिस्ट्रॉयर क्षेपणास्त्रांचा सराव करून संपूर्ण जगाला थक्क केले. रशियन क्षेपणास्त्रांमध्ये पारंपरिक क्षेपणास्त्रे तसेच दोन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा समावेश होता. ज्यावर जगातील कोणत्याही देशाने अद्याप तोडगा नाहीए. ही रशियन क्षेपणास्त्रे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात अणुबॉम्ब टाकण्यास सक्षम आहेत, जे कोणत्याही शहराला क्षणार्धात राखेचा ढीग बनवू शकतात.

युक्रेनमध्ये गाडीचा अचानक स्फोट; रशियाचं 'फॉल्स फ्लॅग ऑपरेशन' सुरू?

महत्वाचे लेख