अ‍ॅपशहर

'या' देशात मोठा निर्णय; बलात्कार करणाऱ्याला नपुंसक करणार

बलात्काराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी अनेकदा कठोर कारवाईची मागणी होत असते. बलात्काऱ्याला नपुंसक करण्याची शिक्षा देण्याचे आदेश नायजेरियातील एका राज्याने काढले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2020, 4:48 pm
अबुजा: वाढत्या बलात्काराच्या घटनांना रोखण्यासाठी आता बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे. इतकंच नव्हे तर १४ वर्षाखालील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यास दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अनेक देशांमध्ये महिलांविरोधात अत्याचार वाढत असताना या सरकारने घेतलेल्या निर्णयाची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nigeria-protest-against-rape
'या' देशात मोठा निर्णय; बलात्कार करणाऱ्याला नपुंसक करणार


जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशांमध्ये बलात्काराच्या घटना वाढत आहे. नायजेरियातही या घटना वाढत असल्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. कदुना प्रातांत लोकांचा रोष इतका वाढला की राज्यपालांना आणीबाणीच जाहीर करावी लागली. राज्यपाल नसीर अहमद इल रुफई यांनी सांगितले की, गुन्हेगारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

वाचा: बलात्कार करणाऱ्याला नपुंसक करा: इम्रान खान

वाचा: जेवण आणि सेक्स म्हणजे 'दिव्य आनंद'!; पोप फ्रान्सिस यांचा दावा

देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार आहे. त्याशिवाय, एखाद्या महिलेनेदेखील १४ वर्षाखालील मुलावर बलात्कार केल्यास त्या महिलेचे गर्भाशय काढून टाकण्यात येणार आहे. तर, १४ वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. देशात वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटना पाहता महिला संघटनांनी बलात्काऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. लोकांच्या संतापाची दखल घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयात अल्पवयीन मुलांवर महिलांकडून होणाऱ्या अत्याचाराचा समावेश करण्यात आला आहे.

वाचा: अरेरे! पाळीव श्वानाने १२ दिवसाच्या बालकाचे घेतले प्राण

दरम्यान, पाकिस्तानमध्ये परदेशी महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा डागाळली गेली. पाकिस्तानमध्येही या घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरून महिलांनी संतप्त निदर्शने केली. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्काऱ्यांना जाहीरपणे फाशी द्यावी अथवा नपुंसक करावे असे वक्तव्य केले आहे. इम्रान खान यांनी महिलांविरोधात लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचे एक राष्ट्रीयपातळीवरील नोंदवही तयार करण्यास सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्यास इतरही धजावणार नाहीत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज