अ‍ॅपशहर

India Russia भारत-रशियाचे संबंध कसे असणार? पुतीन यांनी घेतली 'ही' भूमिका

India Russia: भारत आणि रशियातील संबंधात दुरावा आला असल्याच्या चर्चा सुरू असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दोन्हा देशांच्या संबंधाबाबत मोठे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2020, 12:27 pm
मॉस्को: भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असताना जुना मित्र रशिया दुखावला गेल्याची चर्चा सुरू होती. नव्या वर्षात भारत आणि रशिया यांचे कसे असतील यावर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भाष्य केले आहे. नव्या वर्षात रशिया-भारताचे संबंध अधिक चांगले होण्याच्या दृष्टीने काम सुरू राहणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Putin and Modi
संग्रहित छायाचित्र


राष्ट्रपती पुतीन यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाताळ आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पुतीन यांनी म्हटले की, रशिया आणि भारत हे दोन्ही देश विशेष रणनीतिक भागिदारीच्या संबंधातून जोडले गेले आहेत. करोना महासाथीचा आजार आणि इतर समस्या उभ्या ठाकल्या असतानाही दोन्ही देश विश्वासाने प्रगती करत आहेत.

वाचा: येमेनचं नवं सरकार लँड होताच विमानतळावर स्फोट!; २२ ठार, ५० जखमी

क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापक राजकीय संवाद सुरू असून विविध क्षेत्रातील संयुक्त प्रकल्पांच्या बाजूने असल्याने त्यांनी सांगितले.

वाचा: फक्त करोनाच नव्हे तर 'या' घडामोडींनी जगाचे लक्ष वेधले

भारताचा मोठा मित्र आहे रशिया

भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्री अनेक दशके जुनी आहे. भारत-रशियाच्या मैत्रीत कटुत्व कधीही आले नाही. त्याशिवाय, मागील काही वर्षांमध्ये रशिया-भारताचे रणनीतिक संबंध स्थिर आहेत. दोन्ही देशांमध्ये नेतृत्व बदल झाले तरी मैत्री संबंधावर कोणताही परिणाम झाला नाही.

वाचा: फक्त करोनाच नव्हे तर 'या' घडामोडींनी जगाचे लक्ष वेधले

शिखर परिषदेमुळे चर्चा


भारत आणि रशियात होणारी शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. अमेरिकेसोबत वाढत्या मैत्री संबंधामुळे रशिया दुखावला असल्याची चर्चा होती. मात्र, यंदाची परिषद ही करोना महासाथीच्या आजारामुळे टाळली गेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज