अ‍ॅपशहर

करोना: आरोपांकडे दुर्लक्ष करत रशियाकडून लशीचे उत्पादन सुरू

करोनाला अटकाव करणारी जगात पहिली लस विकसित केली असल्याची घोषणा केल्यानंतर रशियाने लशींचे उत्पादन सुरू केले आहे. रशियाच्या लस दाव्यावर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी संशय व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2020, 4:49 pm
मॉस्को: जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांकडून होणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करत रशियाने आपली करोनावरील लस 'स्पुटनिक व्ही' या लशीचे उत्पादन सुरू केले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. येत्या १२ महिन्यांत ५० कोटी लस डोस बनवण्यास सक्षम असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vaccine
Representative image


रशियाच्या आरोग्य विभागाने सांगितले की, आम्ही विकसित केलेली लस सर्व आवश्यक चाचणीतून गेलेली आहे. ही लस करोनाच्या संसर्गाचा मुकाबला करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. ही लस दोनदा टोचण्यात येते. या लशीमुळे करोनाच्या संसर्गाविरोधात दोन वर्ष रोगप्रतिकार शक्ती निर्माण होईल. या लशीची ७६ लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे चाचणी करण्यात आली आहे.

वाचा: आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने करोनावरील १०० हून अधिक औषधांचा शोध

वाचा: अखेर वुहान प्रयोगशाळेने मौन सोडले; विषाणूबद्दल सांगितली 'ही' माहिती

रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, या लशीचे उत्पादन लवकरच परदेशातही सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि फिलीपाईन्समध्ये या लशीची चाचणी होणार आहे. तर, दुसरीकडे ब्रिटनमधील वृत्तपत्र डेली मेलनेद दिलेल्या वृत्तानुसार, ही लस कितपत सुरक्षित आहे, याची चाचणी करण्यात आलेली नाही. त्याशिवाय या लशीचे साइड इफेक्टसही समोर आले असल्याचे वृत्तात म्हटले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, ३८ स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. लस दिल्यानंतर चाचणीच्या ४१ दिवशी ३१ स्वयंसेवकांमध्ये साइड इफेक्ट्स आढळले. रशियाने लशीवर उपस्थित करण्यात आलेले सर्व प्रश्न फेटाळून लावले आहेत. आमची लस सुरक्षित असून २० देशांमधून या लशीसाठी मागणीही करण्यात आल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा: रशियानंतर 'या' देशाकडे जगाचे लक्ष; तीन लशींची चाचणी अंतिम टप्प्यात

वाचा: तंबाखू सेवनामुळे आजार; जगभरातील ७० टक्के रुग्ण भारतात

रशियाच्या लशीवर जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देश शंका उपस्थित करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने लशीबाबत माहिती मागवली आहे. त्याशिवाय रशियाने या लशीसाठी केलेले संशोधनही जाहीर करण्याची मागणी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्यापही रशियाच्या लशीला मान्यता देण्यात आलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज