अ‍ॅपशहर

Russian Navy पाहा: रशियन युद्धनौकेने जपानी समुद्रात डागले घातक क्षेपणास्त्र

Russian Navy missile: रशियन नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियन नौदलाने जपान समुद्रात (Sea of Japan) क्षेपणास्त्र डागले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2021, 4:57 pm
मॉस्को: अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपली युद्ध सज्जता वाढवली आहे. रशियन नौदलाच्या उत्तर फ्लीटला सक्रिय केल्यानंतर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पॅसेफिक फ्लीटलादेखील गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी रशियन नौदलाच्या गाइडेड मिसाइल फ्रिगेट मार्शल शापानशिकोव्हने जपानच्या समुद्रात कॅलिबर क्रूज क्षेपणास्त्र डागले. चाचणीसाठी क्षेपणास्त्र डागण्यात आले असल्याचे रशियाने म्हटले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Russian-Navy-missile
रशियन युद्धनौकेने जपानी समुद्रात डागले क्षेपणास्त्र


रशियन मंत्रालयाने या क्षेपणास्त्राचा व्हिडिओ ट्विच केला आहे. मार्शल शापानशिकोव्हने जपान समुद्रात केप सेर्कुम फायरिंग रेंजमध्ये पहिल्यांदाच जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कॅलिबर क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र १००० किमी अंतरावरील लक्ष्याचे वेध घेण्यास सक्षम आहे.

वाचा: चार आठवड्यात महायुद्ध सुरू होणार? रशियन विश्लेषकांनी दिला इशारा

वाचा: अरुणाचल प्रदेशमध्ये चीनचा नवा डाव; भारताला सतर्कतेचा इशारा


वाचा: भारतात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; 'या' कारणामुळे जगाला चिंता
रशियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीमुळे पॅसिफिक महासागर भागामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो. या भागात रशियाशिवाय जपान आणि अमेरिकेचे सैन्यदेखील गस्त घालत असते. अशा स्थितीत तणाव वाढल्यास त्याचे जागतिक परिणाम होऊ शकतात. चीनदेखील रशियासोबत या भागामध्ये गस्त वाढवत आहे. चीन-रशिया यांच्याविरोधात अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांसोबत जपानने युद्ध अभ्यासाची तयारी सुरू केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज