काठमांडू : नेपाळमधील दाट जंगलात शनिवारी हेलिकॉप्टर कोसळून सहा प्रवासी मृत्युमुखी पडले, तर एक महिला प्रवासी बचावली. हेलिकॉप्टरमधून सात जण प्रवास करीत होते. या घटनेत एका परदेशी नागरिकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळपासून बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर नेपाळच्या धादिंग आणि नवाकोट जिल्ह्याच्या सीमेवरील दाट जंगलाच्या भागात कोसळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अॅटिट्यूड एअर प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणाले, 'पायलट के. सी. निश्चल आणि हिरोमी कोमास्तू या जपानी ट्रेकरसह सहा जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. अत्यंत दुर्गम भागात ही घटना घडली आहे. बचाव पथकाने सहा जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेत एक महिला प्रवाशी बचावली आहे. काठमांडू विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर सुमारे ३२ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर सकाळी ८.१० वाजता हेलिप्टरचा संपर्क तुटला होता.
हेलिकॉप्टर कोसळून सहा ठार
नेपाळमधील दाट जंगलात शनिवारी हेलिकॉप्टर कोसळून सहा प्रवासी मृत्युमुखी पडले, तर एक महिला प्रवासी बचावली हेलिकॉप्टरमधून सात जण प्रवास करीत होते...
Maharashtra Times 9 Sep 2018, 4:00 am