अ‍ॅपशहर

दोन मजली इमारतीला विमान धडकले; एका मुलासह आठ जण ठार

Italy plane crash विमानातील पायलटसह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सरकारी वृत्तवाहिनी 'राय टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानातील प्रवासी फ्रान्सचे नागरिक असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Oct 2021, 12:32 pm
मिलान: इटलीतील मिलान शहरात रविवारी एका लहान विमानाचा अपघात झाला. धावपट्टीवर उतरण्याआधी एक लहान विमान मिलान येथील दोन मजली इमारतीला धडकले. या अपघातात एका लहान मुलासह आठ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. विमानाची धडक झाल्यानंतर या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या जवळ असणाऱ्या वाहनांनाही आगीची झळ बसली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Italy-plane-crash
लँडिंगआधी विमान दोन मजली इमारतीला धडकले; एका मुलासह आठ ठार


विमान धडकलेली इमारत रिकामी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी झाली नाही. मात्र, ही इमारत मेट्रो रेल्वे स्टेशनच्या जवळ होती. इमारतीजवळ उभ्या असलेल्या वाहनांमध्ये चालक अथवा प्रवासी नव्हता. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात विमानातील प्रवाशांशिवाय इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा 'पँडोरा' गौप्यस्फोट; जगभरात खळबळ


पँडोरा गौप्यस्फोट: पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधक अडचणीत
'लाप्रेस' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या लहान विमानातील पायलटसह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सरकारी वृत्तवाहिनी 'राय टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानातील प्रवासी फ्रान्सचे नागरिक असण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमध्ये इंधन संकट; अखेर लष्करामार्फत होणार इंधन वितरण
मिलानजवळील सान डोनाटो मिलानीज या लहान शहरात हा अपघात झाला. विमान दोन मजली इमारतीला धडकल्यानंतर आग लागली. आगीमुळे निर्माण झालेले धुराचे लोळ काही किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. अपघातग्रस्त विमानाने मिलानच्या लिनेट विमानतळ आणि इटलीतील सारिदिनिया बेटादरम्यान उड्डाण घेतले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज