बेंगळुरू : कर्नाटकातील हंपी येथे ऐतिहासिक जागतिक वारसास्थळी तोडफोड करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहेत. हंपीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. काही दिवसांपूर्वी येथे तीन तरुणांनी तेथील खांबांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरला झाला. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील बेतुल येथील एका तरुणाने इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र त्यानंतर हे अकाउंट डिलीट करण्यात आले. या तीन समाजकंटकांना पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे बळ्ळारीचे पोलिस अधीक्षक अरुण रंगराजन यांनी सांगितले. हंपी हे तत्कालीन विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. तेथील उच्च दर्जाची वास्तुकला ही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे.
समाजकंटकांकडून हंपीत तोडफोड
कर्नाटकातील हंपी येथे ऐतिहासिक जागतिक वारसास्थळी तोडफोड करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, समाजकंटकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहेत. हंपीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
PTI 4 Feb 2019, 4:00 am