अ‍ॅपशहर

'या' देशात होणार गोहत्या बंदी, पण मांस खाण्यास परवानगी!

Sri Lanka Cow Slaughter Ban: श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देशभरात गोहत्या बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच विधेयक सादर केले जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2020, 6:06 pm
कोलंबो: संपूर्ण श्रीलंकेमध्ये गोहत्येवर बंदी लागू करण्यात येणार आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी ही बंदी लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. राजपक्षे यांनी आपल्या सत्ताधारी 'श्रीलंका पोडुजना पेरुमना' पक्षाच्या (एसएलपीपी) संसदीय बैठकीत ही माहिती दिली. गोहत्येवर बंदी आणली तरी गोवंश, गोमांस खाण्यास बंदी नसणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sri Lanka To Possibly Ban Cow Slaughter Soon
या देशात होणार गोहत्या बंदी, पण मांस खाण्यास परवानगी!


राजपक्षे यांचे सरकार लवकरच याबाबत एक विधेयक आणणार आहे. गोहत्या बंदी कायदा लागू करण्याबाबत फार आधीपासून विचार होता. मात्र, कायदा करणे शक्य झाले नाही. आता मात्र, कायदा करण्यात येणार आहे. राजपक्षे यांच्याकडे बौद्ध शासन, धार्मिक आणि सांस्कृतिक विभागाची जबाबदारी आहे. याबाबतचे विधेयक कधी मंजूर करणार, हे त्यांनी अद्यापही स्पष्ट केले नाही. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मिय आहेत. तर, देशात ९० टक्क्यांहून अधिकजण मांसाहार करतात. तर, हिंदू आणि बौद्ध धर्मिय समुदाय हा गोमांस खात नसल्याचे म्हटले जाते. मागील अनेक वर्षांपासून बौद्ध धर्मिय गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

वाचा: आमची पसंती भारताला, चीनसोबत करार ही घोडचूक; श्रीलंकेला उपरती

वाचा: अरेरे! मालवाहतूक करणारे जहाज समुद्रात बुडाले; ५८०० गायींचा मृत्यू

गोहत्येवर बंदी घातली तरी, आयातीवर बंदी घालण्यात येणार नसल्याचे राजपक्षे यांनी म्हटले. या प्रस्तावाला राजपक्षे यांच्या पक्षातील सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. राजपक्षे यांच्या पक्षाने गोहत्या बंदीच्या मागणीला कायमच पाठिंबा दिला आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे यांच्या पक्षाच्या नेतृत्वातील आघाडी स्पष्ट बहुमत मिळाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज