अ‍ॅपशहर

आत्मघातकी बॉम्बस्फोटाने मदिना हादरले

मुस्लिम धर्मीयांसाठी दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे स्थान असलेल्या मदिना येथील प्रेषित मोहम्मद मशिदीच्या सुरक्षा मुख्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला. यात चार पोलीस तसेच तीन हल्लेखोर ठार झाले.

Maharashtra Times 5 Jul 2016, 7:46 am
रियाध : मुस्लिम धर्मीयांसाठी दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे स्थान असलेल्या मदिना येथील प्रेषित मोहम्मद मशिदीच्या सुरक्षा मुख्यालयाजवळ सोमवारी सायंकाळी आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला. यात चार पोलीस तसेच तीन हल्लेखोर ठार झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suicide bombers hit 3 saudi cities including prophets mosque in medina
आत्मघातकी बॉम्बस्फोटाने मदिना हादरले


जेद्दाह येथील अमेरिकी वकिलात परिसरात तसेच सौदी अरेबियाच्या पूर्व भागातील शिया पंथीयांच्या एका मशिदीबाहेरही आत्मघाती दहशतवाद्यांनी स्वत:ला उडवले. त्याचवेळी, बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सोमवारी किमान २० स्फोट झाले.

अल अरेबिया चॅनलने मदिना मिशीदीजवळ असलेल्या पार्किंगच्या परिसरात आगीचा भडका उडाल्याची दृष्ये दाखवली आहेत. त्यात एक मृतदेहही दिसत आहे. तर अरब न्यूजने हल्ल्यात सहा जण ठार झाल्याचे म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज