अ‍ॅपशहर

काबूल: पाकिस्तानविरोधात अफगाण नागरिक संतप्त; तालिबानचा आंदोलकांवर गोळीबार

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला मदत करणाऱ्या पाकिस्तानविरोधात अफगाण नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. राष्ट्रपती भवनाजवळ आंदोलकांच्या मोर्चावर तालिबानने गोळीबार केला असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Sep 2021, 3:24 pm
काबूल: अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान करत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात अफगाण नागरिकांनी सोमवार रात्रीपासून निदर्शने, घोषणाबाजी सुरू केली. मंगळवारीदेखील काबूलमध्ये पाकिस्तानविरोधात आणि आयएसआय प्रमुखांविरोधात शेकडोजण रस्त्यांवर उतरले. तालिबानने आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Afghan-protest-against-paki
काबूलमध्ये पाकिस्तानविरोधात मोर्चा


स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढणाऱ्या जमावाविरोधात राष्ट्रपती भवनजवळ तालिबानने गोळीबार केला. या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. राष्ट्रपती भवनजवळ काबूल सेरेना हॉटेल आहे. याच ठिकाणी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत.

तालिबानकडून सरकार स्थापन सोहळ्याचे आमंत्रण; चीन, रशियाने घेतली 'ही' भूमिका

तालिबानींनी काही पत्रकारांवरही दडपशाही केल्याचे वृत्त आहे. या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार, कॅमेरामन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अफगाणिस्तामध्ये मागील एक दोन दिवसांपासून पाकिस्तानविरोधात आंदोलन होत आहे.



हिंदी महासागरात 'ड्रॅगन' वाढवतोय वर्चस्व; भारताची डोकेदुखी वाढली!




पाकिस्तानने पंजशीरमध्ये तालिबानविरोधी गटांवर ड्रोन हल्ले केले होते. त्याशिवाय पाकिस्तानचा अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप सुरू आहे. त्यानंतर स्थानिक अफगाण नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज