अ‍ॅपशहर

अफगाणिस्तान: महिला कल्याण मंत्रालय तालिबानकडून बंद

अफगाणिस्तानमधील महिलांना अधिकार देणार असल्याची घोषणा तालिबानी नेत्यांनी केली होती. आता मात्र तालिबानी राजवटीने आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली असून महिला कल्याण मंत्रालय बंद केले असून त्याऐवजी महिलांवर 'बंधने' घालणारे खाते तयार केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2021, 1:16 pm
काबूल: कधीकाळी अफगाणिस्तानातील महिलांसाठी असलेले कल्याण मंत्रालय अफगाणिस्तानच्या नव्या तालिबान शासकांनी शनिवारी बंद करून टाकले आहे. आता या इमारतीत त्यांनी सद्गुणांचा प्रसार आणि दुर्गुण रोखण्यासाठीचे मंत्रालय स्थापन केले आहे. यावेळी त्यांनी या इमारतीत काम करणाऱ्या जागतिक बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही जबरदस्तीने बाहेर काढले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Taliban on Womens welfare
संग्रहित छायाचित्र


महिलांच्या अधिकारांवर निर्बंध लादण्याची तालिबानची ही एक नवीन चाल असून, काबूल ताब्यात घेतल्यानंतर आणि सरकारमध्ये आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांनी ही कारवाई केली आहे. सन १९९०च्या दशकात आपल्या राजवटीत तालिबानने मुली आणि महिलांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता. तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनावर बंदी घातली होती.

अमेरिका, ऑस्ट्रेलियावर फ्रान्स संतप्त; राजदूत मायदेशी बोलावले

काबुलमधील महिला कल्याण मंत्रालयाच्या बाहेर शनिवारी एक नवीन चिन्ह लावण्यात आले होते. महिला कल्याण मंत्रालयाच्या ऐवजी आता या ठिकाणी सद्गुणांचा प्रसार आणि दुर्गुण रोखण्यासाठीचे मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच जागतिक बँकेचा दहा कोटी डॉलरचा महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास कार्यक्रम शनिवारी बंद करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे सदस्य शरीफ अख्तर यांना काढण्यात आल्याचीही घोषणा करण्यात आली.

'या' कारणांसाठी तालिबानशी बोलणी सुरू ; पाकिस्तानची कबुली
अफगाण वुमन नेटवर्कच्या प्रमुख माबौबा सूरज म्हणाल्या की, तालिबान सरकारने महिला आणि मुलींना दिलेल्या आदेशांमुळे आपल्याला धक्का बसला आहे.

ट्विटरला तालिबान प्रवक्ता चालतो, पण ट्रम्प यांच्यावर बंदी; अमेरिकेत नवा वाद!
तालिबानकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण मंत्रालयाने इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारपासून त्यांच्या पुरुष शिक्षकांसोबत शाळेत जाण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थिनींनी या वर्गांमध्ये हजेरी लावण्याबाबत काहीच उल्लेख नव्हता.

तालिबानी दहशतीच्या छायेत हक्कांसाठी महिलांचा लढा
दरम्यान, शनिवारी पूर्व प्रांतीय राजधानी जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करून झालेल्या स्फोटांमध्ये तीन जण ठार झाले आणि २० जण जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु, इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचे मुख्यालय या भागात आहे आणि ते तालिबानचे शत्रू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज