मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधकांनी रविवारी येथे काढलेल्या रॅलीदरम्यान पोलिसांनी विरोधी नेते अॅलेक्सी नवाल्नी यांच्यासह हजारोंना अटक केली.
रशियामधील आगामी निवडणुकांमध्ये पुतिन सरकारच बाजी मारणार, असा अंदाज वर्तवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना 'काल्पनिक निवडणुका' असे संबोधून हजारे नागरिक रस्त्यावर उतरले. रॅलीदरम्यान पोलिसांनी अॅलेक्सी यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यात ते खाली रस्त्यावर पडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ओढत बसमध्ये नेले. सुमारे चार हजार विरोधक या रॅलीत सहभागी झाले होते. आपल्याला अटक झाली असली, तरी तुम्ही सर्व जण आपला लढा चालूच ठेवा, असे ट्विट अॅलेक्सी यांनी केले आहे.