अ‍ॅपशहर

धक्कादायक...करोनासारख्या हजारो विषाणूंचा धोका!

या शतकाच्या सुरुवातीला दोन व्हायरसमुळे निर्माण झालेले महासाथीचे आजार प्राण्यांमधील विषाणूंमुळे माणसांपर्यंत पोहचले होते. 'कोविड-१९' हा तिसरा महासाथीचा आजार आहे. वैद्यकीय संशोधन या प्राणघातक व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, व्हायरसचा संसर्ग ही फक्त सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या काळात आणखी प्राणघातक व्हायरसचा सामना माणसांना करावा लागणार आहे. करोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील निम्मी लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये आहे. आतापर्यंत जवळपास करोनाच्या संसर्गामुळे ७५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, १३ लाख ४७ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. करोनाच्या संसर्गामुळे जगभरात अनेक बदल झाले आहेत. करोनासारखे आणखी हजारो व्हायरस असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. हे विषाणू कधीही मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2020, 6:00 pm
करोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील निम्मी लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये आहे. आतापर्यंत जवळपास करोनाच्या संसर्गामुळे ७५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, १३ लाख ४७ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. करोनाच्या संसर्गामुळे जगभरात अनेक बदल झाले आहेत. करोनासारखे आणखी हजारो व्हायरस असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. हे विषाणू कधीही मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात. या शतकाच्या सुरुवातीला दोन व्हायरसमुळे निर्माण झालेले महासाथीचे आजार प्राण्यांमधील विषाणूंमुळे माणसांपर्यंत पोहचले होते. 'कोविड-१९' हा तिसरा महासाथीचा आजार आहे. वैद्यकीय संशोधन या प्राणघातक व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, व्हायरसचा संसर्ग ही फक्त सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या काळात आणखी प्राणघातक व्हायरसचा सामना माणसांना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thousands of virus likes coronavirus can attack on human said expert
धक्कादायक...करोनासारख्या हजारो विषाणूंचा धोका!


माणसांचे प्राण्यांच्या हद्दीत अतिक्रमण

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार, प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणांवर विषाणू आढळणे ही बाब संशोधक, अभ्यासकांसाठी धोकादायक नाही. मात्र, माणसांकडून सातत्याने प्राण्यांच्या हद्दीत अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळेच प्राण्यांमधील व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. जंगल क्षेत्र कमी होणे, प्राण्यांचा अधिवास असलेल्या जंगलातील झाडे कापून शेती करणे यातून हा संसर्गाचा धोका वाढला असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केला आहे. वर्ष १९६० च्या दशकात जगाची लोकसंख्या ही ३ अब्ज होती. सध्या जगाची लोकसंख्याही ७.७ अब्ज झाली आहे. त्यामुळे अन्नधान्याची मागणी वाढली आहे. वाढलेल्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करणे हेदेखील संसर्ग वाढण्याचे एक मुख्य कारण आहे.

विषाणूंच्या संसर्गाला माणूस कारणीभूत!

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २१ व्या शतकात आतापर्यंत तीन मोठ्या संसर्गजन्य आजारांची महासाथ आली होती. यामध्ये सार्स, मर्स आणि सार्स-कोविड२ या तीन संसर्गजन्य आजारांचा समावेश आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, या नव्या विषाणूंनी प्राण्यांनामधून माणसांमध्ये प्रवेश केला आहे. माणसांनी निवारा, जागतिक पातळीवर परिवहन व सोयींसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हे विषाणू जंगलातून बाहेर आले असून जगभरात पसरले. महासाथीच्या आजाराचे तज्ञ डीर्क प्फेइफ्फर यांनी सांगितले की, हे विषाणू याआधीदेखील होते. निसर्गाचा ते एक भाग आहेत. मात्र, माणसांनी आपल्या सोयीसाठी निसर्गात असंतुलन तयार केले असून जंगलात थेट अतिक्रमण केले आहे. जंगली प्राणी आणि विषाणूंच्या अधिवासावर हल्ला होत आहे. या विषाणूंबाबत याबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र, हे अतिक्रमण माणसांसाठी प्राणघातक ठरत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज