अ‍ॅपशहर

इंडोनेशियात दुहेरी बॉम्बस्फोट; ३ ठार

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात तीन ठार आणि अनेक जण जखमी झाले असून हा आत्मघाती हल्ला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जकार्तामधील ट्रान्सजकार्ता बस टर्मिनलमध्ये हे साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांत वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Times 24 May 2017, 9:34 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जकार्ता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम three dead in twin blasts at a transport terminal in jakarta
इंडोनेशियात दुहेरी बॉम्बस्फोट; ३ ठार


इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात तीन ठार आणि अनेक जण जखमी झाले असून हा आत्मघाती हल्ला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जकार्तामधील ट्रान्सजकार्ता बस टर्मिनलमध्ये हे साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांत वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक वेळेनुसार रात्री ९च्या सुमारास हे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये तीन जण ठार झाल्याचे जकार्ताचे पोलीस प्रमुख अॅन्ड्री विबोवो यांनी मेट्रो टीव्हीला सांगितले. ५ मिनिटांच्या अंतराने हे दोन स्फोट घडवण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज