अ‍ॅपशहर

कदाचित 'ब्रेक्झिट' प्रत्यक्षात येणार नाही!: केरी

'ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा कौल ब्रिटिश जनतेनं दिला असला तरी त्या निर्णयाची अमलबजावणी होईलच असं ठामपणं सांगता येणार नाही. खुद्द ब्रिटनलाच त्याची घाई दिसत नाही,' असं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी मांडलं आहे.

Maharashtra Times 29 Jun 2016, 3:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम top us diplomat john kerry says brexit may not happen
कदाचित 'ब्रेक्झिट' प्रत्यक्षात येणार नाही!: केरी

'ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा कौल ब्रिटिश जनतेनं दिला असला तरी त्या निर्णयाची अमलबजावणी होईलच असं ठामपणं सांगता येणार नाही. खुद्द ब्रिटनलाच त्याची घाई दिसत नाही,' असं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी मांडलं आहे.

जॉन केरी यांनी नुकतीच ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर 'ब्रेक्झिट'बद्दल त्यांनी हे भाकीत केलं आहे. 'ब्रेक्झिट' हा एक अत्यंच किचकट व गुंतागुंतीचा घटस्फोट आहे. कॅमेरून हे युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा विरोधात होते. आता सार्वमत विरोधात गेल्यामुळं शक्तिहीन झाल्याची त्यांची भावना झाली आहे. ही प्रक्रिया अमलात आणण्याबाबत ते स्वत: संभ्रमात आहेत,' असं केरी म्हणाले.

'लिस्बन करारातील कलम ५०च्या अमलबजावणीस कॅमेरून नाखूष आहेत. कारण या कलमाची अमलबजावणी केल्यास युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल व दोन वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. कोणत्याही नव्या कराराशिवाय युरोपियन युनियनमधून बाहेर पडून ब्रिटन स्वत:ची कोंडी करू इच्छित नाही,' असं केरी म्हणाले.

'ज्या गोष्टीवर विश्वास नाही, ती गोष्ट करण्याची वेळ आल्यावर कॅमेरून यांना सामर्थ्यहीन वाटणं साहजिक आहे,' असं म्हणत केरी यांनी कॅमेरून यांच्याबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज