अ‍ॅपशहर

ट्रम्प प्रशासनाने मागितले ४६ अॅटर्नींचे राजीनामे

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेल्या तब्बल ४६ अधिवक्त्यांकडे (अॅटर्नी) महाधिवक्ता जेफ सेशन्स यांनी राजीनामे मागितले आहेत. अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाने ही माहिती दिली. यात प्रीत भरारा या भारतीयाचाही समावेश आहे.

Maharashtra Times 12 Mar 2017, 2:30 am
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेल्या तब्बल ४६ अधिवक्त्यांकडे (अॅटर्नी) महाधिवक्ता जेफ सेशन्स यांनी राजीनामे मागितले आहेत. अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाने ही माहिती दिली. यात प्रीत भरारा या भारतीयाचाही समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trump administration asks preet bharara and 45 us attorneys to quit
ट्रम्प प्रशासनाने मागितले ४६ अॅटर्नींचे राजीनामे


ट्रम्प यांच्या कार्यकाळात नेमणूक करण्यात आलेल्या बहुसंख्य अधिवक्त्यांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत. मात्र अद्याप चार डझन अधिवक्ते कार्यरत आहेत. या सर्वांना पदमुक्त करण्याच्या दृष्टीने सामायिक धोरण असावे, या हेतूने ४६ अॅटर्नींचे राजीनामे मागण्यात आले आहेत, अशी माहिती कायदा मंत्रालयाच्या प्रवक्त्या सारा फ्लोरेस यांनी दिली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांची सरशी झाल्यानंतर भारतीय वंशाचे अॅटर्नी प्रीत भरारा यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले होते. या भेटीत ट्रम्प यांनी भरारा यांना सेवेत कायम राहाण्याची सूचना केली होती, अशी वृत्ते प्रसिद्ध झाली होती. याकडे लक्ष वेधले असता फ्लोरेस म्हणाल्या की जॉर्ज बुश व बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाही असेच प्रकार घडले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज