अ‍ॅपशहर

Donald Trump वर्क फ्रॉम हॉस्पिटल; ट्रम्प यांची बनवेगिरी? सोशल मीडियावर ट्रोल

Donald Trump updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लष्करी रुग्णालयात करोनावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल असतानाही ट्रम्प कार्यरत असल्याचे दर्शवण्यासाठी व्हाइट हाउसने काही फोटो प्रसिद्ध केले होते. आता या फोटोवरून वाद सुरू झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2020, 5:00 pm
वॉशिंग्टन: करोनाची बाधा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ट्रम्प यांची प्रकृती चांगली असल्याचे दर्शवण्यासाठी व्हाइट हाउस ट्रम्प हे रुग्णालयातही काम करत असल्याचे फोटो प्रसिद्ध केले होते. मात्र, याच फोटोवरून ट्रम्प ट्रोल झाले असून त्यांनी यातही बनवेगिरी केली असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trump work from Hospital
वर्क फ्रॉम हॉस्पिटल; ट्रम्प यांची बनवेगिरी


डोनाल्ड ट्रम्प हे रुग्णालयात उपचारा दरम्यान कार्यरत असल्याचा संदेश या फोटोतून देण्याचा प्रयत्न केला. या फोटोत ट्रम्प हे काही कागदांवर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत होते. मात्र, फोटो झूम केल्यानंतर ट्रम्प यांच्या समोर एक कोरा कागद होता. या कोऱ्या कागदावर ट्रम्प यांनी स्वत:चेच नाव लिहीले असल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांच्या या फोटोवर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू झाली आहे. या फोटोशूटविरोधात #Staged असा ट्रेंड सुरू केला आहे.

वाचा: करोना संकटात संधी! ट्रम्प यांच्या 'या' डावाने विरोधक हैराण

वाचा: खरंच की काय..'या'मुळे नाही फैलावत करोनाचा संसर्ग!

एका फोटोत ट्रम्प यांनी सफेद शर्ट घातला असून कॉन्फरन्स टेबलवर असलेल्या एका फाइलवर ते पेनाने मार्किंग करताना दिसले. दुसऱ्या एका फोटोत एका गोलाकार टेबलवर बसून एका कागदावर पेनाने काही तरी लिखाण करताना दिसत आहे. 'द एअर करंट'चे संपादकांनी या दोन्ही फोटोंची तुलना आणि माहिती घेतली असता त्यांना या फोटोत १० मिनिटांचे अंतर आढळले. पहिला फोटो ट्रम्प यांनी ५ वाजून २५ मिनिटे आणि दुसरा फोटो ५ वाजून ३५ मिनिटांनी काढला असल्याचे समोर आले. व्हाइट हाउसमधील घडामोडींचे वार्तांकन करणारे अॅण्ड्र्यू फेनबर्ग यांनी फोटोचे विश्लेषण केले. त्यांनी सांगितले की, ट्रम्प हे सफेद कागदावर आपले नाव लिहीत असल्याचे समोर आले आहे.

वाचा: ट्रम्प यांच्यावर 'या' नव्या औषधाने होत आहेत उपचार!

वाचा: मी पुन्हा येईन! ट्रम्प यांचा रुग्णालयातून व्हिडिओ संदेश



ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली असताना ते अमेरिकेसाठी काम करत आहेत. अमेरिकी नागरिकांसाठी काम करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असं ट्विट त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी केले होते. मात्र, ट्रम्प यांचा हा प्रसिद्धीसाठी खटाटोप असल्याचा आरोपही लोकांनी केला. ट्रम्प यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट केला असल्याची टीका अमेरिकन नागरिकांनी सोशल मीडियावर केली. करोनाची बाधा झाल्यानंतरही फोटो काढताना ट्रम्प यांनी मास्क परिधान केले नसल्याचा मुद्दा एकाने उपस्थित केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज