अ‍ॅपशहर

तात्पुरत्या ‘खर्चा’ला ट्रम्प यांची मान्यता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सरकारच्या तात्पुरत्या खर्चाच्या विधेयकावर सही केली. त्यामुळे, सरकारसमोरील काही दिवसांचा प्रश्न मिटला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2018, 9:29 am
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम donald-trump


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सरकारच्या तात्पुरत्या खर्चाच्या विधेयकावर सही केली. त्यामुळे, सरकारसमोरील काही दिवसांचा प्रश्न मिटला आहे.

रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार, सोमवारी रात्री उशिरा समझोता झाल्यानंतर अमेरिकेतील तीन दिवसांचे 'शटडाउन' संपले होते. अमेरिकेतील सात लाख स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. वित्त विधेयकांवर कोणताही निर्णय न झाल्यामुळे सरकारची कोंडी झाली होती आणि तीन दिवस सरकारचे कामकाज पूर्ण ठप्प झाले होते. दरम्यान, स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, डेमोक्रॅटिक पक्षाने सहकार्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयानंतर, सरकारी सेवेतील हजारो कर्मचारी पुन्हा कामावर परतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज