अ‍ॅपशहर

ट्रम्प यांची उमेदवारी निश्चित

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी पाच राज्यांमध्ये झालेल्या प्रायमरीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळविला आहे. तर, चार राज्यांमध्ये विजय मिळाल्याने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचीही आघाडी कायम आहे.

Maharashtra Times 28 Apr 2016, 12:54 am
फिलाडेल्फिया : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी पाच राज्यांमध्ये झालेल्या प्रायमरीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळविला आहे. तर, चार राज्यांमध्ये विजय मिळाल्याने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचीही आघाडी कायम आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trump sweeps 5 states edges closer to republican nomination
ट्रम्प यांची उमेदवारी निश्चित


अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी मेरीलँड, कनेक्टिकट, डेलवेअर, पेनसिल्वानिया आणि ऱ्होड या पाच राज्यांमध्ये प्रायमरी झाली. या पाचही राज्यांमध्ये ट्रम्प यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी सर्व प्रायमरींमधून १२३७ मते मिळविणे आवश्यक असून, ट्रम्प यांना आतापर्यंत ९५० मते मिळाली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज