अ‍ॅपशहर

ट्रम्प यांच्या दूरध्वनीमुळे अमेरिकेत नवा वाद

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ट्रम्प यांनी शुक्रवारी अनेक आशियाई देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

Maharashtra Times 4 Dec 2016, 2:19 am
तैवानशी नव्याने जवळीक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trumps new us argument due to telephone
ट्रम्प यांच्या दूरध्वनीमुळे अमेरिकेत नवा वाद


वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

ट्रम्प यांनी शुक्रवारी अनेक आशियाई देशांच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मात्र यात त्यांनी तैवानचाही समावेश केल्याने अमेरिकेच्या तैवानसंबंधी परराष्ट्र धोरणात १८० अंशांत बदल झाल्याचे दिसून आले. या वर्षाच्या सुरुवातीला अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल ट्रम्प यांनी त्साई यांचे अभिनंदन केले. तसेच, उभय देशांदरम्यानच्या आर्थिक, राजकीय आणि सुरक्षाविषयक संबंधांवर चर्चा केली.

चीनकडून निषेध

ट्रम्प यांनी केलेल्या या वार्तालापाचा आम्ही अमेरिकेकडे निषेध नोंदवला आहे. वन चायना या धोरणाला असलेला पाठिंबा अमेरिकेने कायम ठेवावा. तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी व्यक्त केली.

माध्यमांची टीका

ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच तैवानच्या अध्यक्षांशी संपर्क साधून अमेरिकेचे चार दशकांपासूनचे परराष्ट्र धोरण आश्चर्यकारकपणे मोडीत काढले आहे. या कृतीमुळे अमेरिका व चीनदरम्यानचे संबंध ताणले जाऊ शकतात, अशी टीका न्यूयॉर्क टाइम्सने केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज