लंडन : ब्रिटनमधील लीथ शहरात गुरुद्वार जाळण्याचा प्रयत्न बुधवारी करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे. लेथ शहरातील गुरु नानक गुरुद्वारा साहिबला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लावण्यात आली. त्यासाठी पेट्रोल बाँबचा वापर करण्यात आला. अग्निशामक दलाच्या २० बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत गुरुद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. एडिंबरा पोलिस पुढील तपास करीत असून, एका ४९ वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
गुरुद्वार जाळण्याचा प्रयत्न
ब्रिटनमधील लीथ शहरात गुरुद्वार जाळण्याचा प्रयत्न बुधवारी करण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे...
PTI 30 Aug 2018, 4:00 am