अ‍ॅपशहर

russia ukraine news : '... शस्त्रास्त्रे द्या, मी पळपुटा नाही', रशियाविरुद्ध धैर्याने लढणाऱ्या युक्रेनच्या अध्यक्षांचा व्हिडिओ जारी

रशियान फौजा युक्रेनच्या राजधानीत दाखल झाल्या आहेत. पण युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की धैर्याने रशियाच्या हल्ल्यांचा सामना करत आहेत. झेलेन्स्की यांनी नवीन व्हिडिओ जारी केला आहे. आपण पळून जाणार नाही. मला शस्त्रास्त्र द्या, असं त्यांनी म्हटलं आहे.

Authored byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2022, 1:06 pm
किव्ह : युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन फौजा दाखल झाल्या असून युक्रेनची आता निकराची ( Ukraine Russia War ) लढाई सुरू आहे. किव्ह रस्त्यांवर युक्रेन आणि रशियाच्या सैनियाकांमध्ये लढाई होत आहे. किव्हवर क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले होत आहेत. रशियान रणगाड्यांनी ( russia ukraine news ) किव्हचे रस्ते धडधडत आहेत. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नागरिकांना शस्त्र उचलण्याचे आवाहन केले आहे. आपण किव्हमध्ये आहोत आणि देशाची सुरक्षा करत राहणार, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. देश सोडून पळण्याची अमेरिकेची ऑफर त्यांनी फेटाळून लावली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ukraines president volodymyr zelensky released new video
'... शस्त्रास्त्रे द्या, मी पळपुटा नाही', रशियाविरुद्ध धैर्याने लढणाऱ्या युक्रेनच्या अध्यक्षांचा व्हिडिओ जारी


युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना अमेरिकेने राजधानी किव्ह सोडण्यास सांगितले. पण झेलेन्स्की यांनी नकार दिला आहे. 'येथे युद्ध सुरू आहे. मला शस्त्रास्त्र आणि दारूगोळा हवा आहे, पळून जाण्यासाठी वाहन नाही', असे झेलेन्स्की म्हणाले. या प्रकरणाशी परिचित असलेल्या अमेरिकेच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे धैर्यशील असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले. शत्रूने त्याला टार्गेट क्रमांक 1 आणि त्याचे कुटुंब टार्गेट क्रमांक 2 म्हणून चिन्हांकित केले आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.


'भारतावर कोसळू शकते आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र...', रशियाने अमेरिकेला फटकारले

झेलेन्स्कीनी केले चर्चेचे आवाहन

झेलेन्स्की यांनी शनिवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. व्हिडिओमध्ये ते किव्हच्या रस्त्यावर दिसत आहे. त्यांनी देश सोडण्यास नकार दिला आहे. झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना संघर्ष थांबवण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. 'संपूर्ण युक्रेनमध्ये लढाई सुरू आहे. वाटाघाटीसाठी चर्चा करूया, असे झेलेन्स्की यांनी म्हटल्याचे एका वृत्तसंस्थेने नमूद केले आहे. पुतीन यांनीही शुक्रवारी ट्विट केले होते. मॉस्को युक्रेनशी उच्च-स्तरीय चर्चेसाठी तयार आहे, असे ते ट्विटमध्ये म्हणाले.

'वीटो'च्या ताकदीवर UN समोर रशियाची शिरजोरी, 'नाटो' तोंडावर; जाणून घ्या 'वीटो'ची ताकद
लेखकाबद्दल
सचिन फुलपगारे
सचिन फुलपगारे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत, मीडियामध्ये काम करण्याचा १९ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आणि मुद्द्यांवर काम करण्यात आवड आहे. सतत नवीन शिकण्याची तयारी.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज