अ‍ॅपशहर

'UN ला दहशतवादाची व्याख्याच माहिती नाही'

दहशतवादाची व्याख्याच संयुक्त राष्ट्रांना (UN) माहितीच नाहीए, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं आहे. नरेंद्र मोदी सध्या बेल्जियमच्या दौऱ्यात आहेत. बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता.

Maharashtra Times 31 Mar 2016, 2:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ब्रसेल्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम un does not know definition of terrorism pm modi in brussels
'UN ला दहशतवादाची व्याख्याच माहिती नाही'

दहशतवादाची व्याख्याच संयुक्त राष्ट्रांना (UN) माहितीच नाहीए, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं आहे. नरेंद्र मोदी सध्या बेल्जियमच्या दौऱ्यात आहेत. बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता.

दहशतवादाचा धोका संपूर्ण जगाला आहे. त्यामुळे दहशतवादाचा प्रश्न गंभीर्याने घेण्याची गरज आहे. पण या प्रश्नाचा सामना करण्याऐवजी ही जागतिक संस्था इतर मुद्द्यांवर आपला वेळ घालवत आहे. संयुक्त राष्ट्रांना अजूनही दहशतवादाची व्याख्या करता आलेली नाही, हे दुर्दैव आहे. दहशतादाला ज्या देशांमधून समर्थन मिळतंय आणि त्याला खतपाणी घातलं जातंय त्या देशांवर संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मोदींनी केली.

दहशतवादाचा धर्माशी संबंध जोडला जावू नये. मानवतेचा शत्रू असलेल्या दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. दहशतवादाला शस्त्रांनी संपवता येणार नाही. तर दहशतवादाकडे तरुण वळणार नाहीत यासाठी समाजात बंधुभावाचं वातावरण निर्माण करावं लागेल, असं मोदींनी स्पष्ट केलं. जगाला दहशतवादाची आता दिसतो पण गेल्या ४० वर्षापासून दहशतवादाचा सामना करतोय, असं मोदींनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज