अ‍ॅपशहर

Pakistan काश्मीरवर अमेरिकेचे ट्विट; पाकिस्तानचा थयथयाट सुरू

Pakistan US Kashmir: अमेरिकेने केलेल्या ट्विटमुळे पाकिस्तानचा चांगलाच थयथयाट सुरू झाला आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये ४जी इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केल्याबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ट्विट केले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2021, 12:00 pm
वॉशिंग्टन/इस्लामाबाद: अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनाने काश्मीरवर केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण आणि मध्य आशिया ब्युरोने काश्मीरमध्ये पुन्हा ४जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत केले. पाकिस्तानने या ट्विटवर आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Qureshi Pakistan minister
काश्मीरवर अमेरिकेचे ट्विट; पाकिस्तानचा तिळपापड


अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाने जम्मू-काश्मीरमध्ये ४जी इंटरनेट सुविधा सुरू झाली असल्याचे उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला. पाकिस्तानने या ट्विटटची दखल घेतली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, जम्मू-काश्मीरच्या मुद्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अनेक प्रस्तावांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे.

वाचा: क्षेपणास्त्रांसाठी उत्तर कोरियाकडे पैसा येतो कुठून? UN ने सांगितला स्रोत

वाचा:
काश्मीरवर 'या' नुसारच तोडगा काढवा; इम्रान खान यांचा शांततेचा सूर


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले की, बायडन प्रशासनाला काश्मीरमधील परिस्थितीकडे दुर्लक्ष करता कामा नये. काश्मीरच्या मुद्यावर शांततेने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. बायडन प्रशासन अधिकारांची चर्चा करतते. मात्र, काश्मीरमधील वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचे कुरेशी यांनी म्हटले. तर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या धोरणाबाबत अमेरिकेने कोणताही बदल केला नाही.

वाचा: बायडन प्रशासनाचे भारताबाबत मोठे वक्तव्य; दिले मोठे संकेत!

ट्विटमध्ये काय म्हटले होते?


परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण आणि मध्य आशिया ब्युरोने म्हटले की, भारतात जम्मू-काश्मीरमध्ये ४ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय स्थानिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच परिस्थिती लवकरच सामान्य होईल आणि राजकीय आणि आर्थिक प्रगती सुरू राहिल याबाबत आम्ही आश्वास्त असल्याचे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज