अ‍ॅपशहर

US Election Updates अमेरिका निवडणूक: भारतीय वंशाच्या चार उमेदवारांचा विजय

US Election updates Indian Congressman won: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रतिनिधी सभेसाठी झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे चार उमेदवार पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. भारतीय वंशाच्या या खासदारांच्या गटाला 'समोसा कॉकस' म्हटले जाते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Nov 2020, 3:27 pm
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत चार भारतीय वंशाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. हे चारही उमेदवार डेमोक्रॅटीक पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. विजयी उमेदवारांमध्ये डॉ. एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Indian American lawmakers’ Samosa Caucus
भारतीय वंशाच्या चार उमेदवारांचा विजय


भारतीय वंशाच्या प्रतिनिधींच्या गटाला कृष्णमूर्ती हे 'समोसा कॉकस' असे म्हणतात. या गटामध्ये आणखी एका सदस्याची भर पडणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. आणखी एक उमेदवार डॉ. हीरल तिपिरनेनी यांनी एरिजोनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डेव्हिड श्वेकर्ट यांच्या विरुद्ध निर्णायक आघाडी घेतली आहे. ५२ वर्षीय हीरल विजयी झाल्यास त्या प्रतिनिधी सभेत दाखल होणाऱ्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या महिला असणार आहेत. याआधी प्रमिला राजपाल २०१६ च्या निवडणुकीत प्रतिनिधी सभेत निवडून गेल्या होत्या. 'समोसा कॉकस' गटात सध्या पाच भारतीय-अमेरिकन खासदार आहेत. यामध्ये चौघे प्रतिनिधी सभेचे सदस्य आहेत. तर, पाचव्या सदस्या सिनेटर कमला हॅरीस आहेत. कमला हॅरीस या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.

वाचा: मतमोजणीत गोंधळ; सुप्रीम कोर्टात दाद मागणार: ट्रम्प
वाचा: पिछाडीनंतर ट्रम्प यांची मुसंडी; 'या' राज्यांवर आहे नजर!

कृष्णमूर्ती यांनी लिबरटेरियन पक्षाचे उमेदवार प्रेस्टन नेल्सन यांचा पराभव केला. शेवटची माहिती हाती येईपर्यंत त्यांना ७१ टक्के मते मिळाली आहेत. रो खन्न यांनी भारतीय वंशाचे आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रितेश टंडन यांचा पराभव केला आहे. त्यांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. खन्ना सलग तिसऱ्यांदा कॅलिफोर्नियामधून अमेरिकन कॉग्रेसची निवडणूक जिंकले आहेत. तर, डॉ. एमी बेरा यांनी पाचव्यांदा विजय मिळवला.

वाचा: जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भूभाग; ट्रम्प ज्युनिअर यांचे वादग्रस्त ट्विट

यंदाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची भूमिका अतिशय निर्णायक ठरली आहे. भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी रिपब्लिक आणि डेमोक्रॅटीक या दोन्ही पक्षांकडून जोर लावण्यात आला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज