अ‍ॅपशहर

मुंबईकर तरुणीला अमेरिकेत ट्रम्पच्या नावानं धमकी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्याने अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच, 'तू माझ्याशी लग्न कर अन्यथा ट्रम्प तुला अमेरिकेबाहेर काढेल', अशी अजब धमकी मूळची मुंबईकर असलेल्या एका तरुणीला अमेरिकेत दिल्याची घटना समोर आली आहे. स्वराली करुलकर असे या तरुणीचे नाव असून ती मूळची मुंबईची असून दादरची रहिवाशी आहे.

Maharashtra Times 12 Nov 2016, 4:39 pm
मटा ऑनलाइन वृत्त । न्यूयॉर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम us president donald trump mumbai based choreographer threatened new york city
मुंबईकर तरुणीला अमेरिकेत ट्रम्पच्या नावानं धमकी


अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्याने अमेरिकेत भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच, 'तू माझ्याशी लग्न कर अन्यथा ट्रम्प तुला अमेरिकेबाहेर काढेल', अशी अजब धमकी मूळची मुंबईकर असलेल्या एका तरुणीला अमेरिकेत दिल्याची घटना समोर आली आहे. स्वराली करुलकर असे या तरुणीचे नाव असून ती मूळची मुंबईची असून दादरची रहिवाशी आहे.

न्यूयॉर्क शहरात एका अनोळखी व्यक्तीने स्वराली हिला गाठून लग्न करण्यासाठी दबाव टाकला. व तू असे केले नाही तर तुला ट्रम्प हे देशाबाहेर काढतील, अशी धमकी दिली. स्वराली ही गेल्या दोन वर्षापासून अमेरिकेत राहत असून तिथे ती मुलांसाठी प्री-स्कूलमध्ये काम करतेय. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक निकालानंतर आपल्याला खूप वाईट अनुभव आल्याचे स्वराली म्हणतेय. अमेरिकेत आलेले अनुभव तिने पोस्टमधून मांडले आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर काही तासांच्या आत एका मुस्लिम कुटुंबाला त्याच्या सहा वर्षाच्या मुलांसोबत हॉटेलमधून बाहेर काढले. त्यांच्या अंगावर कॉफी फेकून तुम्ही तुमच्या देशात परत जा, असे हिणवल्याचे स्वरालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मॅनहटनमधील १२ स्ट्रीट या गर्दी असलेल्या रस्त्यावरून चालत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती माझ्यासमोर आली. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले परंतु त्यानं मला अश्लिल भाषेत आवाज देत 'तू माझ्याशी लग्न कर, मी तुला अमेरिकन बनवेन', त्याच्या या बोलण्याकडेही मी दुर्लक्ष केले व पुढे गेले. परंतु त्यानं पाठलाग करणं सुरुच ठेऊन मला शिवीगाळ केली. 'माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्यासारख्या अनिवासीतेला ट्रम्प देशाबाहेर फेकून देईल', अशी धमकी त्यानं दिली. माझ्या मदतीला काही लोक धावल्यानंतर तो तेथून पसार झाल्याचं स्वरालीने सांगितलं. गेल्या काही दिवसापासून असाच वाईट अनुभव येत असल्याचं तिनं म्हटलंय. एका दिवशी सकाळी ब्रॉडवे जंक्शन भुयारीमार्गातून चालताना एका महिलेने माझ्याकडे भुयारी मार्गाचा प्रवासीपास मागितला. मी नकार देताच त्या महिलेने मला ढकलले, या कृतीनं मी हादरलेच असं स्वराली म्हणाली.

२०१४ साली ‘डान्स मूव्हमेंट थेरपी’च्या पदव्युत्तर शिक्षणासाठी स्वराली न्यूयॉर्कला आली होती. त्याआधी ती अनेक भारतीय रिअॅलिटी शोध्ये सहभागी झाली आहे. 'डान्स इंडिया डान्स'च्या चौथ्या सीझनच्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली होती. शिवाय 'डान्स इंडिया डान्स'च्या लिटील मास्टर्सच्या तिसऱ्या सीझनमध्ये तिने ऑनस्क्रिन मार्गदर्शनही केले आहे. न्यूयॉर्क शहर आवडल्याने तिने पदवी शिक्षणानंतरही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. सध्या ब्रुकलिन येथील बेडफोर्ड स्टुव्हसेंटमध्ये तिला घर मिळाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात घडलेल्या या दोन घटनांनी मला आता घराबाहेर पडायची सुद्धा भीती वाटत असल्याचे स्वरालीने म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज