अ‍ॅपशहर

अमेरिकेत शाळेत घुसून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

US School Shooting: अमेरिकेतील आयोवा येथील एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक शिक्षिका गंभीर जखमी आहे.

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2023, 9:08 am
आयोवाः अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. आयोवाच्या एका युथ आउटरीच सेंटरमधील शाळेत अज्ञात माथेफिरुने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, एक शिक्षिका जखमी झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम america shooting


गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. डेस मोइनेस शाळेत एका शैक्षणिक कार्यक्रमादरम्यान गोळीबाराची घटना समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आपातकालीन कर्मचाऱ्यांना शाळेत पाचारण करण्यात आलं होतं.

वाचाः सिनेमाला लाजवेल असा बुलढाण्यात दरोडा; १ कोटींच्या दरोड्याची उकल अखेर झालीच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजता शाळेत गोळीबार सुरू झाला आणि या घटनेत दोन विद्यार्थ्यांना गोळी लागली. जखमी विद्यार्थ्यांना लगेचच अधिकाऱ्यांकडून सीपीआर देण्यात आला. मात्र, दोन्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर, जखमी शिक्षिकेची स्थिती नाजूक असून सोमवारी तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


वाचाः धुळे- मध्यप्रदेशकडे जाताना टायर फुटून क्रूझर पलटी, मागून येणारं वाहन थेट तापी नदीत कोसळलं

गोळीबाराच्या घटनेनंतर जवळपास २० मिनिटांनी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोम किमी दूर असलेल्या एका कारला अडवून त्यातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, त्यातील एक कारमधून पळून गेला आहे. मात्र, अधिकारी त्याची अधिक चौकशी करुन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

वाचाः दादा भुसेंचं टेन्शन वाढणार, मालेगावात भाजपला खिंडार, ठाकरेंना विधानसभेचा उमेदवार मिळाला
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख