अ‍ॅपशहर

बर्नी सँडर्स यांच्यावरील मीम व्हायरल; सांगितला व्हायरल फोटोचा किस्सा

स्वेटर, हातमोजे घालून खुर्चीवर बसलेल्या आजोबांच्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोतील आजोबा हे अमेरिकेतील ज्येष्ठ सिनेटर बर्नी सँडर्स असून त्यांनी व्हायरल होणाऱ्या मीमवर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2021, 1:46 pm
वॉशिंग्टन: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र, अमेरिकेचे ज्येष्ठ सिनेटर आणि राष्ट्राध्यक्षपदाचे माजी उमेदवार बर्नी सँडर्स यांची सर्वाधिक चर्चा झाली. शपथविधी सोहळ्यात अनेकांनी डिजायनरकडून तयार करण्यात आलेले खास कपडे परिधान केले होते. मात्र, बर्नी यांनी फॅशनऐवजी कम्फर्ट वाटणाऱ्या वेशभूषेला प्राधान्य दिले. बर्नी यांच्या या फोटोवर बनवलेल्या मीमने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bernie-sanders
बर्नी सँडर्स यांच्यावरील मीम व्हायरल



बर्नी यांचे हे कपडे का घातले?

बर्नी सँडर्स हे शपथविधीच्या सोहळ्यात विंटर जॅकेट आणि हातमोजे घालून सहभागी झाले होते. शपथविधी सोहळ्यात ते आपल्या खुर्चीवर बसले होते. त्यावेळी काढण्यात आलेला बर्नी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत एका शोमध्ये सहभागी झालेल्या बर्नी यांना छेडण्यात आले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, त्यावेळी खूप थंडी होती. त्यामुळे एका ठिकाणी बसून होतो आणि सोहळ्याच्या ठिकाणी काय सुरू आहे, हे पाहत होतो. आपल्यावर बनवण्यात आलेले मीमही पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.


वाचा: कमला हॅरीस यांचा शपथविधीतल्या ड्रेसचा रंग जांभळा का होता ?

वाचा: बायडन यांच्या ऐतिहासिक भाषणालाही भारतीय 'टच'

ड्रेसमध्ये खास काय?

बर्नी सँडर्स यांचे हातमोजे खास आहेत. वर्मोन्टमध्ये एका शालेय शिक्षिका जेन इलिस हे हातमोजे तयार केले होते. त्याबाबत बोलताना सँडर्स यांनी सांगितले की, हे हातमोजे एसेक्समध्ये राहणाऱ्या एका महिलेने तयार केले होते. ही महिला शिक्षिका असून चांगली माणूस आहे. या हातमोज्यांची मागणी वाढली असल्याचे समोर आले आहे. जेन यांनी सांगितले की, हे हातमोजे जुन्या स्वेटरच्या लोकरीपासून तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय प्लास्टीक बाटल्यांचा पुर्नवापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे हातमोजे थंडीपासून चांगला बचाव करतात असे त्यांनी सांगितले.


वाचा: भारताकडून ब्राझीलला करोना लशींची संजीवनी; बोल्सोनारोंनी 'असे' मानले आभार!

बर्नी सँडर्स कोण आहेत?

बर्नी सँडर्स हे अमेरिकेतील ज्येष्ठ सिनेटरपैकी एक आहेत. अमेरिकेतील कामगार, वर्णद्वेष विरोधी चळवळींना त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला आहे. सोशल डेमोक्रॅटीक, पुरोगामी धोरणांचे ते खंदे समर्थक आहेत. आर्थिक विषमता आणि उदारीकरणाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. अमेरिकेतील डाव्या विचारांच्या प्रभावी नेत्यांपैकी एक आहेत. बर्नी यांनी २०१६ आणि २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटीक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना प्रायमरीमध्ये अपयश आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज