अ‍ॅपशहर

पोकेमॉनने बलात्कार केल्याची तक्रार!

जगभरात व्हायरल झालेल्या पोकेमॉन गो मोबाइल गेमबाबत रोज नवे किस्से ऐकायला मिळत असताना रशियातील एका महिलेने पोकेमॉनने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. या महिलेने याबाबत पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली असून या तक्रारीचा तपास करायचा तरी कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

Maharashtra Times 12 Aug 2016, 10:26 am
मटा ऑनलाइन वृत्त । मॉस्को
महाराष्ट्र टाइम्स.कॉम woman tells police she was raped by a pokemon go character
पोकेमॉनने बलात्कार केल्याची तक्रार!


जगभरात व्हायरल झालेल्या पोकेमॉन गो मोबाइल गेमबाबत रोज नवे किस्से ऐकायला मिळत असताना रशियातील एका महिलेने पोकेमॉनने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. या महिलेने याबाबत पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली असून या तक्रारीचा तपास करायचा तरी कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

मॉस्कोमध्ये राहणाऱ्या या महिलेने जी तक्रार दिली आहे त्यात संपूर्ण घटनाक्रम नमूद केला आहे. महिलेची तक्रार अशी... रात्री पोकेमॉन गो गेम खेळता-खेळताच माझा डोळा लागला. मात्र, सकाळी जाग आली तेव्हा पोकेमॉनचे कॅरेक्टर चक्क माझ्या बेडवर पाहून मला धक्काच बसला. पोकेमॉन माझ्या अंगावर होता व त्याने माझ्यावर बलात्कार केला. झटापटीत मी बेडवर खाली कोसळले आणि पोकेमॉन गायब झाला. माझ्या मोबाइलमध्ये असलेलं पोकेमॉन गो अॅप अजूनही पोकेमॉन बेडरूमच्या आसपास असल्याचेच दाखवत आहे.

दरम्यान, महिलेच्या या तक्रारीने मॉस्को पोलीस चक्रावून गेले असून त्यांनी सदर महिलेला मानसोपचारतज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज